Malaria |Eradication Goa Dainik Gomantak
गोवा

Malaria: ‘मलेरिया निर्मूलनात गोवा अग्रेसर’

मलेरिया निर्मूलनात गोवा अग्रेसर असून मलेरियाचे रुग्णांची संख्या शून्य आहे.

दैनिक गोमन्तक

Malaria : मलेरिया निर्मूलनात गोवा अग्रेसर असून मलेरियाचे रुग्णांची संख्या शून्य आहे. मलेरियाचा संसर्ग मूल्यांकन मोजमाप करणारा निर्देशांक एपीआय तपासल्यास उत्तर गोवा -.0.03 आणि दक्षिण गोवा शून्य आहे.

तसेच राज्यातील 34 आरोग्य केंद्रांपैकी 32 मलेरिया मुक्त आहेत, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.

डेंग्यूच्या तुलनेत राज्यात मलेरिया नियंत्रणात असून शेजारच्या राज्यातून येणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवले जात आहे, कारण संसर्ग येथून होण्याची शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणी देखील मलेरिया संसर्गासाठी तपासणी केली जात आहे, अशा डॉ. महात्मे म्हणाल्या.

गेल्या वर्षी चिकूनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सासष्टीत आढळले होते. कर्नाटकातून आलेल्या व्यक्तीमुळे आजार मोती डोंगर येथे संसर्ग झाला होता. त्यामुळे यंदा आरोग्य खात्याकडून पाहणी वाढवण्यात आली आहे. सध्या जानेवारीमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT