Makar Sankranti  Dainik Gomantak
गोवा

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

Makar Sankranti Goa Celebration: तिळगुळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यंदा या सणावर किंचित महागाईचे सावट असून गेल्या वर्षीच्या तुलनेत साहित्यात किंचित दरवाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला मकरसंक्रांती सण तीन दिवसांवर आल्याने या सणाची लगबग सुरू झाली आहे. मकरसंक्रांती म्हणजे नववधूसह सुवासिनींचा उत्साह द्विगुणित करणारा सण होय. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी बहुतेक घरोघरी हळदीकुंकू साजरा करण्यात येतात. मकरसंक्रांतीच्या साहित्याने सध्या बाजार फुलला आहे.

तिळगुळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यंदा या सणावर किंचित महागाईचे सावट असून गेल्या वर्षीच्या तुलनेत साहित्यात किंचित दरवाढ झाली आहे.

हळदीकुंकूसाठी लागणाऱ्या साहित्याची सध्या बाजारात खरेदी सुरू झाली असून पुढील दोन दिवसात खरेदीला जोर येण्याची शक्यता आहे. नववर्षातील या पहिल्याच सणावर यंदा किंचित महागाईचे सावट आहे.

बहुतेक साहित्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. प्रथमच हळदीकुंकू करणाऱ्या सुवासिनीनी वाण म्हणून सुगड, असनीचे दोर आदी पारंपरिक वस्तू द्याव्या लागतात. यंदा सुगड महाग झाले आहेत. तीळ महाग झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT