Gram panchayat Election
Gram panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Salcete: सासष्टीत पंचायतींपासून बहुतांश आमदार ‘अलिप्त’

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर पंचायत निवडणुकीत ‘आप’ आणि ‘आरजी’ मुसंडी मारणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाचा तालुका असलेल्या सासष्टीत अलिप्त राहणेच पसंत केले आहे. आम्ही केवळ चांगल्या उमेदवाराना पाठिंबा देऊ, अशी भूमिका बहुतेक घेतली आहे तर दुसऱ्या बाजूने इतर आमदारांनीही या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरण्याऐवजी काहींना छुपा पाठिंबा देण्याचेच धोरण अवलंबिले आहे.

आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स, आलेक्स सिक्वेरा, व्हेंझी व्हिएगस, उल्हास तुयेकर, क्रूझ सिल्वा या सर्व आमदारांनी या निवडणुकीत आपले पॅनल उभे केलेले नाही.

वेळ्ळी पंचायतीत काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी स्वतःचे पॅनल उभे केले आहे.

प्रत्यक्ष लढण्याऐवजी माझ्या पॅनल विरुद्ध ‘आप’, ‘आरजी’ व तृणमूल एकत्रित येऊन संयुक्त उमेदवार उभे करत आहेत, अशी प्रतिक्रिया डिसिल्वा यांनी व्यक्त केली. डिसिल्वा हे वेळ्ळीचे माजी सरपंच असून मागच्या पाच वर्षात त्यांनी या पंचायतीत स्थिर प्रशासन दिले आहे.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांना त्यांच्या सहभागाबद्दल विचारले असता, ते म्हणाले,की नावेली मतदारसंघात भाजपने काही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजपचे पॅनल म्हणून आम्ही त्यांना उभे केलेले नाही, असे सांगितले.

‘आप’चे कार्याध्यक्ष तथा बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांना विचारले असता, बाणावली मतदारसंघात गावांतील प्रतिनिधींत फूट पडू नये, यासाठी एकच पॅनल कसे निवडून आणता येईल, याकडे आमचे लक्ष आहे. स्थानिक राजकारणात चांगले लोक यावेत असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘आरजी’चे तिओतीन परेरा यांना विचारले असता, आम्ही आरजीचे अधिकृत पॅनल कुठेही उभे केलेले नाही मात्र आमचे कार्यकर्ते कित्येक ठिकाणी निवडणूक लढवित आहेत असे त्यांनी सांगितले.

युरी आलेमाव यांचा अपवाद !

चर्चिल आलेमाव, मिकी पाशेको, बाबाशान डीसा यांनीही आपले पॅनल उभे न करता केवळ आपल्या समर्थकांना पाठिंबा देण्याचे धोरण आखले आहे. याला अपवाद कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव असून त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व पंचायतीत आपले उमेदवार उभे केले असून त्यांचे पाच उमेदवार या आधीच बिनविरोध निवडून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT