Goa Governor's Security Breach Dainik Gomantak
गोवा

केरळमध्ये गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांचे सुरक्षा कवच भेदले; CPM नेत्याच्या मुलावर कारवाईची मागणी

Goa Governor's Security Breach In Kozhikode Kerala: गोवा राजभवन देखील करणार घटनेची चौकशी

Pramod Yadav

Goa Governor's Security Breach: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे सुरक्षा कवच भेदल्याचा प्रकार केरळमध्ये घडला. पिल्लई यांच्या सुरक्षा ताफ्यात अचानक एका खासगी कारने प्रवेश केला, पोलिसांनी वारंवार सांगून देखील संबधित व्यक्तीने सूचनांचे पालन केले नाही.

याप्रकरणी आता संशयित CPM नेत्याच्या मुलावर कारवाईची मागणी केरळ भाजपने केली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात रविवारी (दि.04 फेब्रुवारी) ही घटना घडली.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात सहभागी होऊन कोझिकोड शहरातील आपल्या घरी परतत होते. दरम्यान, मोफसिल बसस्थानकाजवळील आढाकोडी मंदिर रस्त्यावर ताफा दाखल होताच एका खासगी कारने राज्यपालांच्या ताफ्यासह रस्त्यावर घुसण्याचा प्रयत्न केला आणि अडथळा निर्माण केला.

राज्यपालांच्या सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सूचना देऊनही कार चालकाने त्याकडे दुर्लेक्ष केले. कार चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. राज्यपालांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चालकाला वाहन मागे घेण्यास सांगितल्यानंतर राज्यपालांचा ताफा पुढे गेला.

चालक ज्युलियस निकितास याला जवळच्या कसाबा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ज्युलियस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे जिल्हा सचिव पी. मोहनन आणि माजी आमदार के.के. लथिका यांचा मुलगा असल्याचे समोर आले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹1,000 चा दंड वसूल केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. राजकीय नेत्याचा मुलगा असल्याने त्यांच्याविरोधात गंभीर कायदा उल्लंघनाचे आरोप लावण्यात आले नाहीत असा आरोप केला जात आहे.

दरम्यान, गोवा राजभवन देखील या घटनेची चौकशी करणार असून, यात पोलिसांकडून सुरक्षेत त्रुटी होती का याची माहिती घेणार आहेत. तर, केरळमधील भाजप नेत्यांनी याप्रकरणी चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT