Quepem Market Fire Dainik Gomantak
गोवा

Quepem Market Fire: केपे बाजारातील सहा दुकानांना भीषण आग; लाखोंची हानी, सिलिंडर हलविल्‍याने अनर्थ टळला

Quepem Fire Incident: केपे बाजारातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सहा दुकानांना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे: केपे बाजारातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या सहा दुकानांना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दोन हॉटेल्‍स, दोन किराणा दुकाने आणि एका विमा कार्यालयातील साहित्‍य आगीत जळून खाक झाले. माहिती मिळताच कुडचडे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने त्‍यावर नियंत्रण मिळविले.

आग भडकताच स्थानिकांनी हॉटेलमधील गॅस सिलिंडर तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केपे पोलिसांनी पंचनामा केला असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT