Major accident between two cars at Sancoale cortalim Dainik Gomantak
गोवा

कारमध्ये होते एक वर्षाचे बाळ अन् ड्रायव्हरची झोप लागली; सांकवाळ येथे दोन कारचा अपघात, 3 जखमी

सांकवाळ कुठ्ठाळी येथे दोन कारमध्ये भीषण अपघात झाला असून, यात तीनजण जखमी झाले आहेत.

Pramod Yadav

Major accident between two cars at Sancoale cortalim: गोव्यातील अपघातांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होत आहे. यात जखमी तसेच, मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे.

सांकवाळ कुठ्ठाळी येथे दोन कारमध्ये भीषण अपघात झाला असून, यात तीनजण जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हरची झोप लागल्याने हा अपघात झाला अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाळ कुठ्ठाळी येथे इनोव्हा आणि वॅगानार कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीनजण जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे एका कारमध्ये एक वर्षाचे बाळ होत मात्र, सुदैवाने या अपघातात बाळाला कोणतीही जखम झाली नसून, ते सुखरूप आहे. अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ड्रायव्हरची झोप लागल्याने अपघात?

दोन्ही कारमध्ये झालेल्या अपघाताला एका कार चालकाची लागलेली झोप कारणीभूत आहे. असे सूत्रांनी सांगितले आहे. चालकाची झोप लागल्याने कार दुसऱ्या कारला जावून धडकली अशी माहिती मिळत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT