Accident  Dainik Gomantak
गोवा

Quelossim: राज्यात अपघातांचे सत्र संपेना; दुचाकी - बस अपघातात फोंड्याचा युवक ठार

दिवसभरातील रस्ते अपघातात दुसरा बळी

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात सध्या अपघातांचे सत्र सुरूच असून आज दिवसभरात दुसऱ्यांदा एका युवकाचा अपघातात आपले प्राण गमावे लागले असल्याची घटना घडली आहे. नुकत्याचं घडलेल्या दुसऱ्या अपघातात संतोष नाईक याला आपले प्राण गमावावे लागले आहेत.

(Major accident at Quelossim between 2 wheeler and bus )

मिळाल्या माहितीनुसार संतोष नाईक वय 35 रा. आडपाई, फोंडा हे आपल्या दुचाकीवरून जात असताना केळशी येथे दुचाकी आणि बस यांच्यात जोराची धडक झाली. या अपघातामध्ये संतोष याच्या डोक्याला जोराचा मार लागला. तर दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर काही वेळातच संतोष याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.

संतोष नाईक हा कामानिमित्त प्रवास करत असताना तो केळशी येथे आला असता त्याचा अपघात झाला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी उपस्थितांनी दोन्ही वाहनांचा अधिक वेग असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती दिली आहे. हा दुसरा अपघात झाला असून आज दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातात माशेलचा युवक ठार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT