Crime, Murder, Suspect Canva
गोवा

Ponda Death Case: कन्हैय्याकुमारचा खुनी सापडणार कधी? संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Kanhaiya Kumar Mondal Murder Case: २४ जून रोजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत काय चित्रित झाले हे तपासण्यासाठी तज्ज्ञांचे सहकार्य

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील कन्हैय्याकुमार याच्या खून प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी कर्नाटकमधील ट्रकचालक वासुदेव मदार याला अटक केली असली, तरी त्याचा या खुनात हात असल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता पोलिसांकडे या संशयिताची अधिक चौकशी करण्यासारखे काहीच बाकी न राहिल्याने त्याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

फोंडा पोलिस स्थानकातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यरत करण्यात आल्याची माहिती हाती लागली आहे. २४ जून रोजी या कॅमेऱ्यांत काय चित्रित झाले हे तपासण्यासाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेत असल्याची आता माहिती मिळाली आहे.

२४ जूनच्या रात्री फोंडा पोलिसांनी कन्हैय्याकुमार याला ताब्यात घेतले होते. फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट व्हॅनमधून त्याला मध्यरात्रीच्या सुमारास लोटली येथे आणून सोडले होते. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला होता. सुरवातीला हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद केले होते, पण मयताच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केले असल्याचे दिसून आल्यावर नंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT