गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: महिला प्रदेश काँग्रेसच्या संघटन बांधणीला प्रारंभ

Goa Congress: प्रदेश महिला काँग्रेसने संघटन बांधणी करत मतदारसंघनिहाय गट समित्या नेमण्यावर भर दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. परंतु आता पक्षाने पुन्हा एकदा बांधणीला सुरुवात केली आहे. प्रदेश महिला काँग्रेसने संघटन बांधणी करत मतदारसंघनिहाय गट समित्या नेमण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक यांनी पर्वरी, पणजी, कुडतरी या तीन मतदारसंघाच्या गट समिती अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड जाहीर केली.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्यावतीने नुकताच देशभरात स्त्री या पोर्टलद्वारे महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. राज्यात प्रदेश महिला काँग्रेसने संघटनेवर भर दिला असून, कोरोना काळात प्रदेश महिला काँग्रेसच्या सदस्यांनी मदत वाटपाचेही काम केले. अलिकडे सध्या महागाईवर प्रदेश महिला काँग्रेस सतत आवाज उठवित आहे. पक्षाला विधानसभेत यश मिळाले नसले तरी काँग्रेस मजबूत करण्यात प्रदेश महिला काँग्रेसचा सहभाग निश्‍चित दखलपात्र राहणार असल्याने हा विभाग कामाला लागला आहे.

महिला गटसमिती

पणजी महिला गटसमिती अध्यक्षपदी लॅविना डिकॉस्ता यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शबनम आदम खान, पर्वरी गटसमिती अध्यक्षपदी सॅलेट मिरिंडा, उपाध्यक्षपदी कॅरोल रुझारिओ आणि कुडतरी गटसमिती अध्यक्षपदी ॲड. शेख शमशादबी इस्माईलसाब, उपाध्यक्षपदी ख्रिस्टियाना मास्कारेन्हास यांची निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT