Goa Cricket Association Election Dainik Gomantak
गोवा

GCA Election : ... म्हणून जीसीए निवडणूक हरलो; महेश देसाईंचा मोठा गौप्यस्फोट

विपुल फडके यांनी निधीचा गैरवापर केल्याचीही घणाघाती टीका

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा क्रिकेट असोशिएशनचे तत्कालीन सचिव आणि विद्यमान अध्यक्ष विपुल फडके यांनी नियमांचे उल्लंघन करत निवडणूक जाहीर झाली असताना क्रिकेट क्लबना निधी पुरविला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाले. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे मी निवडणूक हरलो असल्याने याबाबत लोकपालांकडे तक्रार केली असल्याचे प्रतिपादन सनी स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष महेश देसाई यांनी केले. ते पणजी जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केतन भाटीकर, विकास पार्सेकर उपस्थित होते.

भाटीकर म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा निधी देता येत नाही. मात्र विपुल फडके यांनी पदाचा गैरवापर करून विविध संस्थांना निधी मंजूर केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली असून एकाअर्थी गोवा क्रिकेट असोशिएशनला लागू असलेल्या बीसीसीआयच्या निवडणूक संहितेचे उल्लंघन झाले. कायद्याप्रमाणे फडते यांना बडतर्फ करावे, अशी मागणी भाटीकर यांनी केली.

जे घडले ते चुकीचे; कारवाई गरजेची

जी घटना घडली ती चुकीची आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात घडता कामा नये. अशी कृत्ये करून खुर्ची मिळविणे गैर आहे. जर विपुल फडके यांना निधी द्यायचाच होता तर त्‍यांनी तो निवडणुकीपूर्वी द्यायला हवा होता. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे, असे देसाई म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT