Crime News Dainik Gomantak
गोवा

Colva Theft: कार धुवून देतो म्हणून गेला, आणि झाला गायब! कोलवा येथील घटना; कर्नाटकात सापडली गाडी, चोरटा मात्र बेपत्ता

Colva Car Theft: महाराष्ट्रातील पर्यटकाची कार कोलवा येथून चोरलेल्या चोरट्याचा अजून थांगपत्ता लागू शकलेला नाही. चोरीला गेलेली कार कर्नाटक राज्यात सापडली असली, तरी संशयित अजूनही गुंगारा देत आहे.

Sameer Panditrao

मडगाव: महाराष्ट्रातील पर्यटकाची कार कोलवा येथून चोरलेल्या चोरट्याचा अजून थांगपत्ता लागू शकलेला नाही. चोरीला गेलेली कार कर्नाटक राज्यात सापडली असली, तरी संशयित अजूनही पोलिसांना गुंगारा देत आहे.

त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी आपले प्रयत्न चालू ठेवले असून कर्नाटक पोलिसांना त्याची माहिती दिली आहे. २८ मे रोजी कोलवा येथील एका रिसॉर्टमध्ये उतरलेल्या ठाणे-महाराष्ट्र येथील संजय तेराडे यांच्या मालकीची मारुती एर्टिगो कार त्याच रिसॉर्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेला प्रशांत एन. याने धुवून देतो असे सांगून ती घेऊन पोबारा केला होता.

याप्रकरणी नंतर तेराडे यांनी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मागाहून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू करून चोरीला गेलेली कार कर्नाटकात जप्त केली होती.

संशयिताने एका दुभाजकाला धडक देऊन कार सोडून  पळ काढला होता. संशयित मूळ कर्नाटकातील शिमोगा येथील आहे. सध्या त्याचा शोध चालू असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT