Eknath Shinde Dainik Gomantak
गोवा

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या गोवा दौऱ्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिंदे यांनी मराठीतून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली होती. आपण स्वतः सरकारमध्ये नसून सरकारला बाहेरुन मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, नंतर जेपी नड्डा स्वतः मीडियासमोर आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी पक्षाची इच्छा असल्याचे सांगितले. यातच आता शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या गोव्याला जाणार आहेत. गोव्यामध्ये ते बंडखोर आमदारांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर आमदारांना ते मुंबईत घेऊन येणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना भेटून त्यांना मुंबईत घेऊन येणार आहेत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला दौरा असणार आहे. बंडखोर आमदार शनिवारी मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याची माहीती एकनाथ गटाचे प्रवक्त दिपक केसरकर यांनी दिली.

शपथविधीनंतर महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले

शपथविधीनंतर महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 2 ते 3 जुलै रोजी होणार आहे. याच अधिवेशनात बहुमत चाचणी आणि सभापतींची निवड होणार आहे.

विधानसभेचे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी

मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये बहुमत चाचणी आणि नवीन सभापतीची निवड होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT