Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water: ‘म्हादई’ चा गुंता सामंजस्यपणे सोडवा; अखिल गोवा कन्नड महासंघाचा सरकारला सल्ला

Goa: म्हादईवर गोव्याचा हक्क आहे, नैसर्गिकस्रोत जल प्रवाह उलट्या दिशेने वळविणे चुकीचे आहे, असे मत अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे हनुमंतप्पा रेड्डी यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: ''म्हादई''चे पाणी दिवसेंदिवस तापत आहे. कर्नाटक सरकारच्या नियोजित ''कळसा-भांडुरा'' प्रकल्पाच्या सुधारीत अहवालास (डीपीआर) केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे.

''म्हादई'' वळविण्यास राज्यभरातून विरोध वाढू लागला आहे. या प्रश्‍नावर गोवा आणि कर्नाटक सरकारने 'सुवर्णमध्य' काढून हा गुंता सामंज्यसपणे सोडवावा. म्हादईवर गोव्याचा हक्क आहे, नैसर्गिकस्रोत जल प्रवाह उलट्या दिशेने वळविणे चुकीचे आहे, असे मत अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे हनुमंतप्पा रेड्डी यांनी व्यक्त केले.

पाच लाख कन्नड लोक

कन्नड महासंघाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोकरीधंद्यानिमित्त गोव्यात वास्तव्य करणाऱ्या कन्नडिगांची संख्या किमान पाच लाख असण्याची शक्यता आहे. डिचोलीत जवळपास 15 हजार कन्नड लोक वास्तव्य करुन आहेत.

''कर्मभूमी कन्नड संघ'' या नावाची संघटनाही गोव्यात कार्यरत आहे.. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी डिचोलीत कन्नड संस्कृती महोत्सवही आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कन्नडीगांचे शक्तीप्रदर्शनही दिसून येत असते. मात्र म्हादईप्रश्नी कन्नडिग स्पष्ट भूमिका मांडत नाहीत.

गोव्यात वास्तव्य करुन असलेल्या कन्नडिगांची जन्मभूमी कर्नाटक असली, तरी गोवा कर्मभूमी आहे. कन्नडिगांचे गोमंतकीयांशी चांगले संबंध आहेत. गोमंतकीयांप्रमाणेच गोव्यात वास्तव्य करून असलेल्या कन्नडिगांनाही पाण्याची तेवढीच गरज आहे.

भविष्यात पाण्याअभावी कोणाचाही घसा कोरडा पडता कामा नये. गोवा आणि कर्नाटक राज्याने ''म्हादई''चा गुंता सामंजस्याने सोडवावा. - हनुमंतप्पा रेड्डी, अध्यक्ष, कन्नड महासंघ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT