Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: हलगर्जीमुळे ‘म्हादईप्रश्‍नी’ कर्नाटकला संधी

कुर्टी खांडेपार ग्रामसभेत संताप ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला. गोवा सरकारच्या हलगर्जीपणामुळेच केंद्र सरकारने कर्नाटकला ही संधी दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

खांडेपार येथील चर्च सभागृहात आज (रविवारी) झालेल्या या ग्रामसभेला सरपंच नावेद तहसीलदार तसेच उपसरपंच व इतर पंचसदस्य उपस्थित होते. प्रारंभी पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

पंचायतक्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर बेकायदा गाडे थाटण्यात आले असून हे गाडे हटवण्यासाठी पंचायतीने काय कारवाई केली, असा सवाल उपस्थित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा विषय येत असल्याने त्यांना पत्रही पाठवल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित खात्याने कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले.

ग्रामसभेत स्मशानभूमी, रस्ते, पथदीप तसेच गटारे आदी विषयांवरही चर्चा झाली. स्वागत सरपंच नावेद तहसीलदार यांनी केले. नीळकंठ नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT