Kalasa- Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : स्वतःवर विश्‍वास ठेवून लढा; दामोदर मावजो

पर्यावरण अभ्यासक प्रजल साखरदांडे म्हणाले, गोव्याच्या अस्तित्वासाठी म्हादई वाचली पाहिजे. म्हादई वाचली तरच आमची संस्कृती, अस्मिता वाचणार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हादईवरून राजकारण करू नका, असे आवाहन शंकर पोळजी यांनी केले. पाण्याचा प्रवाह कोणीही अडवू शकत नाही. हा वैश्विक नियम आहे, असे ''उटा''चे प्रवक्ते गोविंद शिरोडकर यांनी सांगून, म्हादई हातातून गेली, तर सर्वांचे अस्तित्व धोक्यात येणार, अशी भीती व्यक्त केली.

म्हादईवरून राजकारण होत असल्याचा आरोप साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी करून, ''म्हादई'' रक्षणार्थ वेळप्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवा, अशी आर्त हाक त्यांनी दिली. सुभाष वेलिंगकर, तारा केरकर, फादर बोनेलेक्स परेरा, तारा केरकर, हृदयनाथ शिरोडकर, प्रशांत नायक, तारा केरकर, व्हेलंसिओ सिमोईश आदिनी यावेळी आपले विचार मांडले.

पर्यावरण अभ्यासक प्रजल साखरदांडे म्हणाले, गोव्याच्या अस्तित्वासाठी म्हादई वाचली पाहिजे. म्हादई वाचली तरच आमची संस्कृती, अस्मिता वाचणार आहे.

आमची शक्ती दाखवूया!

''म्हादई दिवस'' साजरा करून आमची शक्ती दाखवून देऊया, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ''म्हादई'' हत्या करायला निघाले आहेत, असे साखळीच्या माजी नगराध्यक्ष सुनीता वेरेकर म्हणाल्या.

जर्मनीसारख्या बलाढ्य देशांना नद्यांचे पाणी अडवणे शक्य होत नाही. तर कर्नाटक राज्य म्हादई नदीचे पाणी कसे अडवू शकते? उलट्या दिशेने नैसर्गिक प्रवाह वळविणे चुकीचे आहे, असे मत दत्ता नायक यांनी व्यक्त केले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार : शरण मेट्टी

कामधंद्यानिमित्त गोव्यात 3 लाखांहून अधिक कन्नड लोक राहतात. गोव्यातील जनतेसह गोव्यात वास्तव्य करणाऱ्या कन्नडिगांनाही पाण्याची गरज आहे. म्हादईबाबत कर्नाटकने घेतलेली भूमिका चुकीचा आहे. कारण नैसर्गिक प्रवाह गोव्यात येत असताना ते अडविणे चुकीचे आहे. त्या पाण्यावर गोव्याचाच हक्क आहे. त्याबाबत आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. तसेच म्हादईचे पाणी वळवू नये, यासंदर्भातही मागणी करणार आहोत, असे कन्नड संघाचे शरण मेट्टी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडून म्हादईसाठी संदेश

या सभेला विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ''म्हादई''वर नाच, पथनाट्य आणि लोकनृत्य सादर करून म्हादईची वास्तव स्थिती मांडली. ''आमची म्हादय आमका जाय'' असा निर्धार या विद्यार्थ्यांनी करून आम्हीही ''म्हादई''च्या लढ्यात आहोत, असा संदेश दिला आणि उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या. तियात्रिस्त फ्रांसीस दी तुये यांनी सादर केलेल्या तियात्रातून सरकारची म्हादई विरोधातील भूमिका मांडली. देवाने दिलेल्या ''म्हादई'' आईचा आम्ही सांभाळ करूया, असा संदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT