Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : मुख्यमंत्र्यांना पक्षनिष्ठाच महत्त्वाची!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचा जाहीरपणे प्रचार करत विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आले पाहिजे, असे सांगितले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Issue: म्हादईचे पाणी वळवण्याबाबत कर्नाटक सरकारकडून न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत दादागिरी सुरूच आहे.

या विषयावरून गोव्यात आगडोंब उसळलेला असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात भाजपचा जाहीरपणे प्रचार करत विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आले पाहिजे, असे सांगितले.

डबल इंजिन सरकारच कर्नाटकचा विकास करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. यावरून गोव्यात विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना राज्यहितापेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची वाटल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. याच प्रश्‍नावरून आप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रचारनीतीवर आक्षेप नोंदवला आहे.

भाजपने गोमंतकीयांच्या जखमेवर चोळले मीठ

कर्नाटकात अखेरच्या घटका मोजत असलेल्या भाजप सरकारला मुख्यमंत्र्यांनी प्राणवायू देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. म्हादईला आपली आई म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, अशी गर्जना करण्याचे धाडस तेथे दाखविणे गरजेचे होते.

मात्र, त्यांच्याकडून ते झाले नाही. उलट गोमंतकीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सावंत यांनी केले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आलेमाव यांनी व्यक्त केली.

कर्नाटकच्या अडेलतट्टू भूमिकेचा निषेध

युरी आलेमाव म्हणाले की, म्हादईचे पाणी वळवण्याबाबत कर्नाटक सरकारकडून दादागिरी सुरू आहे. कर्नाटकच्या या अडेलतट्टू भूमिकेबद्दल गोमंतकीयांमध्ये असंतोष उसळला असून ‘सेव्ह म्हादई’ चळवळीमार्फत लढा उभारला जात आहे.

असे असताना, मुख्यमंत्री डॉ. सावंत मात्र कर्नाटकात जाऊन विद्यमान भाजप सरकारच पुन्हा सत्तेवर आले पाहिजे, असे सांगत आहेत. त्यांना भाजपनिष्ठा जास्त महत्त्वाची वाटते, हे स्पष्ट होते.

‘त्या’ विषयाचा सोक्षमोक्ष लावाच

गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना बोलावून यासंबंधीची खरी माहिती सांगावी.

कारण केंद्रीय नेते आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी बैठक घेतल्याचे शहा यांनी सांगितले. या विषयाचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. यासाठीच आम्ही तशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादई नदी वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, असे कर्नाटकला ठामपणे सांगणे गरजेचे असताना तिथल्या सत्ताधारी भाजपसाठी राज्याच्या विरोधात जाऊन प्रचार करणे, हे गोमंतकीयांचा स्वाभिमान गहाण टाकण्यासारखे आहे. - ॲड. अमित पालेकर, आप.

शहांनंतर सावंत कर्नाटकात म्हादईप्रश्‍नी वक्तव्य केल्यावर केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा अडचणीत आले होते.

आता भाजपच्या प्रचार सभेला गेेल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT