Mahadayi Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Sanctuary: म्हादई अभयारण्य परिसर हा टायगर कॉरिडॉरच!

कर्नाटकला जमीन देण्यास वन मंत्रालयाचा ‘रेड सिग्नल’

दैनिक गोमन्तक

Mahadayi Sanctuary: म्हादई परिसर हा टायगर कॉरिडॉर असल्याने कर्नाटक सरकारकडून कळसा प्रकल्पासाठी मागितलेली 26.9 हेक्टर वन जमीन देण्यास केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक अधिकारिणी समितीने स्पष्ट नकार दिला आहे.

त्यामुळे कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याच्या हालचालींना खीळ बसली आहे.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील या विषयावरील सुनावणीलाही दिलासा मिळाला आहे. जलआयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर कर्नाटकने आततायीपणा करत या प्रकल्पासाठी राष्ट्रीय निविदा काढली आहे.

हा प्रकल्प म्हादई, भीमगड अभयारण्याबरोबर राखीव जंगल परिसरातील संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने वन कायदा 1972 आणि 1986 नुसार त्याला केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची स्वतंत्र परवानगी आवश्‍यक आहे.

याशिवाय प्रादेशिक अधिकारिणी समितीच्या (आरईसी) तज्ज्ञांची संमतीही आवश्‍यक आहे, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितली आहे.

कॉरिडॉर महत्त्वाचा

पश्‍चिम घाटातील गोवा कॉरिडॉर हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा भूभाग असून यात पश्‍चिम घाटातील उत्तर आणि दक्षिणेतील प्रदेशनिष्ठ प्राणी-पक्षी आणि वनस्पतींचा अधिवास आहे. या भागामध्ये पाणी वळवणे, हे नैसर्गिक स्रोतांच्या विरोधात असून येथे कोणत्याही प्रकारचे प्रकल्प होऊच नयेत.

उलट हा भूभाग अबाधित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत आशियायी पॅसिफिक ऑन डॅम्स ॲण्ड रिव्हर्सच्या समन्वयक परिणीता दांडेकर यांनी व्यक्त केले.

कर्नाटकने या प्रकल्पासाठी आरईसीसमोर 26.9 हेक्टर वन जमीन मागितली होती. त्याला हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील आणि राष्ट्रीय प्राणी वाघ याच्या वापराचा आणि वावराचा असल्याने या समितीने या प्रकल्पासाठी जमीन देण्यास नकार दिला आहे.

मात्र, गोवा सरकार याप्रश्‍नी अंतिम निर्णयाप्रत पोहोचणार असून सरकारची न्यायालयीन लढाई सुरूच राहील. - देविदास पांगम, ॲडव्होकेट जनरल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

SCROLL FOR NEXT