Mahadayi water dispute in Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: आपल्याला जगवणाऱ्या म्हादईची गोष्ट !

उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचोली, तिसवाडी, बार्देश, पेडणे असे पाच तालुके म्हादईवर अवलंबून आहेत.

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादई नदीचा उगम हा कर्नाटकात झाला. उगमापासून पहिले 29 कि.मी. कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ कि.मी. गोव्यातून ही नदी वाहते.

उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचोली, तिसवाडी, बार्देश, पेडणे असे पाच तालुके म्हादईवर अवलंबून आहेत.

कर्नाटकचा कणकुंबी-कळसा, भांडुरा आणि चोर्ला भागात हलतरा या तीन ठिकाणी धरणांऐवजी 9 ते 12 मीटर उंचीचे बंधारे बांधण्‍याचा नवा प्रस्‍ताव केंद्रीय जल आयोगाने मान्‍य केला आहे.

त्‍याला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खाते व वन्यजीव सल्‍लागार मंडळाचा ‘ना हरकत’ दाखला मिळणे बाकी आहे. अर्थात धरणांचा प्रस्‍ताव रद्दबादल झाल्‍याने या परवान्‍यांची गरज भासणार आहे का?

कर्नाटकचे जलस्रोतमंत्री गोविंद कारजोळ यांनी एका महिन्‍यात नियोजित स्‍थळी काम सुरू करून एका वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्‍याची दर्पोक्‍ती दिली आहे. त्‍याचे काय?

शंकेचे कारण : यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कळसा-भांडुरावरील प्रस्तावित पिण्याच्या पाण्यासाठीच्या प्रकल्पाला कर्नाटकला पर्यावरणीय मान्यतेची गरज नसल्याची घोषणा केली व तसे पत्रही दिले होते.

लवादाची स्थापना 2010 साली करण्यात आली होती.

14 ऑगस्ट 2018 रोजी म्हादई लवादाने दिला निकाल

त्‍यानुसार कर्नाटकला 13.42 टीएमसी पाणी

गोव्याला 24 तर महाराष्ट्राला 1.33 टीएमसी पाणी.

निकालाविरोधात तीनही राज्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयात.

म्हादईच्या मूळ स्रोतांना वळवून ते मलप्रभेत सोडण्याचे कारस्थान कर्नाटक करत आहे. मात्र यामुळे कळसाच्या प्रवाहावर अवलंबून असलेल्या गावांना तसेच म्हादईला सर्वात मोठा धोका ठरणार आहे.

पूर्वपीठिका अशी...

कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी 2002 साली कळसा प्रकल्पाचा शिलान्यास केला.

महाराष्ट्राने 2007 साली दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात धरण बांधकामाला सुरुवात केली.

कर्नाटकचे कळसा, हलतरा, भांडुरा हे तीन बंधारे प्रकल्प आणि महाराष्ट्राचा विर्डी धरण प्रकल्प पूर्णत: म्हादईच्या मूळ जलस्रोतांवर अवलंबून आहेत.

नियोजित बंधाऱ्यांच्या स्थळी असणाऱ्या नद्यांची गोव्याला उपयुक्तता...

कळसा : हा नाला कणकुंबी येथे अस्तित्वात असून सुर्ला गावातून प्रवास करत उस्ते गावात म्हादईला मिळतो.

हलतरा : सुर्ला गावानजीक चोर्ला घाटातील जलस्रोतांनी हलतरा नदीचा प्रवाह तयार होतो. याच हलतरा नदीचे पात्र विर्डी गावातून पुढे गोव्यात वाळवंटी नदीत पोचते.वाळवंटी पिळगाव सारमानस येथे म्हादईच्या मुख्य प्रवाहाला मिळते.

भांडुरा : भांडुरा नदी पुढे जाऊन म्हादईच्या उगमापाशी येऊन मिळते. तेथून तो प्रवाह पुढे गोव्यात वाहत येतो. त्यामुळेच म्हादई भक्कम होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT