Chief Minister Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ‘प्रवाह’मुळे कर्नाटकचे कारनामे उघड होणार’; मुख्यमंत्री सावंत बरसले

म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या प्रवाह अधिकारीणीने उत्तमपणे काम सुरु केल्यानेच कर्नाटकचा तिळपापड होत आहे.

Manish Jadhav

म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या प्रवाह अधिकारीणीने उत्तमपणे काम सुरु केल्यानेच कर्नाटकचा तिळपापड होत आहे. प्रवाहने कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांची पाहणी केल्यानंतर तेथे उमटत असलेले पडसाद हेच दर्शवतात असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

दरम्यान, बेळगाव येथे कदंबची बस अडवून, बसच्या टपावर चढून गोवा विरोधी घोषणा देण्यात आल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

ते म्हणाले की, ही अधिकारीणी पाहणीचा अहवाल तयार करेलच. तो आम्हाला मिळाला, की सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात आम्हाला तो उपयोगी ठरणार आहे. या अहवालामुळे कर्नाटकाचे कारनामे उघड होणार आहेत. कर्नाटकाने म्हादईचे पाणी पळवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांचे पुरेसे पुरावे आहेत. ते योग्य वेळी न्यायालयासमोर (Court) आम्ही ते सादर करु.

प्रवाह अधिकारीणीने दिल्लीला अहवाल सादर केल्याची कर्नाटकातील वर्तमानपत्रांत आज प्रसिद्ध झालेल्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत, असा कोणताही अहवाल तयार केलेला नाही. अहवाल केलाच तर तो केंद्र सरकारला (Central Government) सादर करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही कारण अधिकारीणी ही स्वतंत्र आहे असे जलसंपदा मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT