Ganesh Jayanti 2023 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण मुरगाव तालुका भक्तिमय

श्री गणेशाचा जन्मोत्सव म्हणजेच श्री गणेश जयंती उत्सव बुधवारी मुरगाव तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Ganesh Jayanti: श्री गणेशाचा जन्मोत्सव म्हणजेच श्री गणेश जयंती उत्सव बुधवारी मुरगाव तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी पुढील पाच ते आठ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे.

पार्वतीचा पुत्र श्री गणेशाचा या तिथीला झाला म्हणून या दिवसाला गणेश जयंती उत्सव असे म्हणतात. मुरगाव तालुक्यात आज प्रत्येक गणपती मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यानिमित्त सकाळपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सकाळी श्रीचरणी अभिषेक झाला. नंतर श्री गणेश जन्मसोहळा, पाळणा, किर्तन, दुपारी महाप्रसाद झाला. पुरोहित तसेच महिला वर्गातर्फे पाळणागीत गाऊन गणेश जन्मसोहळा साजरा करण्‍यात आला.

संध्याकाळच्या सत्रात मंदिरांमध्‍ये भजनाचे कार्यक्रम झाले. नंतर रात्री श्रींची पालखी मिरवणूक दिंडीसह वाजतगाजत काढण्यात आली. मुरगाव तालुक्यातील सांकवाळ, दाबोळी, नवेवाडे, मांगोरहिल, शांतीनगर, बायणा, आल्त-रुमडावाडा, बोगदा येथे गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

रात्री पालखी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. श्रींची पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर आरती व तीर्थप्रसाद झाला. बोगदा येथील श्री गणपती मंदिरात दशावतारी नाट्यप्रयोगही झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT