Madgaon Dainik Gomantak
गोवा

Madgaon: पठ्ठ्याने कोल्हापुरहून थेट गोवा गाठलं; चोरीसाठी लढवली अजब शक्कल

चोऱ्या करण्यासाठी कोल्हापूरहून गोव्यात आलेल्या अविनाश पाटील या चोरट्याला मडगाव पोलिसांनी अटक केली.

दैनिक गोमन्तक

Madgaon: ख्रिसमस काळात गोव्यात पर्यटकांची गर्दी असते. त्याचा फायदा उठवून दुचाकी आणि अन्य चोऱ्या करण्यासाठी कोल्हापूरहून गोव्यात आलेल्या अविनाश पाटील या चोरट्याला मडगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

या तीनपैकी दोन दुचाकी मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन आणि गांधी मार्केट परिसरातून चोरल्या होत्या तर तिसरी दुचाकी म्हापसा येथे नोंदणी झालेली असून ती नेमकी कुठून चोरली त्याची माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही, अशी माहिती मडगाव येथील पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

29 डिसेंबर रोजी स्वप्नील अस्नोटीकर याने गांधी मार्केट परिसरात पार्क करून ठेवलेली आपली दुचाकी कुणीतरी चोरल्याची तक्रार मडगाव पोलिसांत दिली असता ती चोरलेली मोटरसायकल घेऊन फिरत असताना हा चोरटा दिसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्य दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

कोल्हापूरहून मडगाव येथे आल्यावर हा चोरटा वेगवेगळ्या ठिकाणी राहात होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्याला मडगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा रिमांड देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT