Masali Market  Dainik Gomantak
गोवा

Margo News : मडगावातील घाऊक मासळी मार्केटची संयुक्तपणे पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margo  News : सासष्टी, मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी मडगाव पालिका, एसजीपीडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांनी

मडगावातील घाऊक मासळी मार्केटची संयुक्त पाहणी केली व हे मार्केट स्वच्छ ठेवण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना आखायला हव्यात यावर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, एसजीपीडीएचे सदस्य सचिव शेख अली व प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच अधिकारी उपस्थित होते.

मुख्याधिकारी शंखवाळकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही पाहणी करण्यात आली आहे. मागे पाहणी करुन जो अहवाल तयार केला होता तो सोमवारी न्यायालयाला सादर करण्यात आला. स्वच्छतेचा प्रश्न हा २००७ पासून न्यायालयात आहे.

प्रश्न आहे तो थर्माकोल पेट्यांचा, या थर्माकोल पेट्या कुठे एकत्रित करून टाकाव्या हे घाऊक मासळी विक्री असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे.

तिथून नगरपालिका त्याची विल्हेवाट लावेल असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या पाहणीचा अहवालही न्यायालयाला सादर केला जाईल, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, थर्माकोल पेट्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तो सोडविण्यासाठी आणखी प्रयत्नांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT