Ghanshyam Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor : मडगाव नगराध्यक्षांविरोधात ‘अविश्वास’ ठराव आज ना उद्या होणारच!

मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात भाजपच्या 15 नगरसेवकांनी अविश्वास ठराव प्रस्तावावर सह्या केल्याचे वृत्त आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor : मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात भाजपच्या 15 नगरसेवकांनी अविश्वास ठराव प्रस्तावावर सह्या केल्याचे वृत्त आहे. मात्र, हा ठराव आज सोमवारी (19 सप्टेंबर) दाखल होणार की नाही हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. हा निर्णय उद्याच घेतला जाईल, अशी माहिती भाजप नगरसेवकांनी दिली.

आपल्या पराभवाबाबत भाजप उमेदवार दामोदर शिरोडकर यांनी सांगितले, निवडणुकीच्या आदल्या दिवशी 15 नगरसेवकांची मुख्यमंत्री व दिगंबर कामत यांच्याशी बैठक झाली. तेव्हा सर्व नगरसेवकांनी आम्ही दामोदर यांच्याच बाजूने मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत माझ्यासहित 14 नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर निवडणुकीच्यावेळी सर्व नगरसेवक सकाळी 11 च्या दरम्यान पालिकेत आले. पण तरीही निकाल माझ्याविरुद्ध लागत 15 विरुद्ध 10 अशा मतांनी मी पराभूत झालो.

निवडणुकीनंतर सर्व 14 नगरसेवकांनी दामोदर देवस्थानाला भेट देऊन शपथ घेतली की आम्ही सर्वांनी दामोदर शिरोडकर यांना मतदान केले आहे. जर सर्वांनी मला मतदान केले तर मला १० मते कशी पडली? माझ्या विरोधात मतदान केलेल्या या नगरसेवकांनी मुख्यमंत्री व स्थानिक आमदारांच्या शब्दाचा मान राखला नाही, हे मला मान्य आहे. मात्र, दामोदर देवाच्या चरणी श्रीफळावर हात ठेवून अशा प्रकारे खोटे बोलणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍नही दामोदर यांनी उपस्थित केला. घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव संमत होऊन निवडणूक झाल्यास चार भाजप नगरसेवक दावा करण्याच्या तयारीत आहेत. यावर ते म्हणाले, की मला जर नगरसेवकांचे समर्थन लाभले तर मी निवडणूक अवश्य लढवेन. मात्र, हा निर्णय नंतर घेतला जाईल.

ठरावाबद्दल माहिती नाही!

अविश्‍वास ठरावाबाबत दामोदर यांनी माहिती दिली, ‘की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अविश्‍वास ठराव मसुद्यावर 15 जणांनी सह्या केल्या होत्या. मात्र, हा ठराव कधी दाखल होणार याची मला कल्पना नाही. मी स्वतः पुढील चार दिवस गोव्याबाहेर असेन.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT