Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor Election : दामोदरांच्या वाटेत काटेच; मडगाव नगराध्यक्ष निवडीत ‘ट्विस्ट’

आणखी चार भाजप नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्ष निवडीच्या घडामोडीत रोज नवीन ट्विस्ट घडत असून दिगंबर कामत यांचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांना भाजपच्याच पाच नगरसेवकांनी पराभवाच्या खाईत लोटल्यानंतर त्यावर उतारा म्हणून घनःश्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी पुढचे भाजप उमेदवार दामोदर शिरोडकर असतील, याची खात्री कुणीच द्यायला तयार नाही. कारण आणखी चार भाजप नगरसेवक या पदासाठी दावा करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या चार नगरसेवकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक, कामिल बार्रेटो यांच्यासह महेश आमोणकर आणि सगुण नाईक यांनीही दावा करण्याचे ठरविल्याने उद्या यदाकदाचित अविश्वास ठराव आणून घनःश्याम शिरोडकर पडले तरी दामोदर शिरोडकर यांच्या वाटेतील काटे तसेच राहतील, असे संकेत मिळत आहेत.

नगराध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाने झाली होती. त्यामुळे एका भाजप नगरसेवकाने उघडपणे शिरोडकर यांना पाठिंबा दिला, तर पाचजणांनी छुप्या रितीने साहाय्य केले. मात्र, अविश्वास ठराव आला तर त्यावर मतदान दाखवून होणार असल्याने घनःश्याम शिरोडकर यांना खुर्ची राखून ठेवायची असेल तर तीन भाजप नगरसेवकांना फोडून आपल्या बाजूने आणण्याची गरज असून त्यांनी उघडपणे शिरोडकर यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत हे काहीसे कठीण दिसते.

यासंबंधी कामिल बार्रेटो यांना विचारले असता, कसेही का असेना, दामोदर शिरोडकर यांना नगरसेवकांचा पाठिंबा नाही हे सिद्ध झाले आहे. नगरसेवक असताना ते इतर नगरसेवकांमध्ये मिसळत नसत. त्यामुळेच त्यांना मते मिळाली नाहीत. या परिस्थितीत उद्या जर परत नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची वेळ आली तर दामोदर यांना उमेदवारी देणे योग्य नाही, हे माझे मत आहे. त्यामुळे मी माझा दावा करणार आहे.

अस्वस्थता कायम

1 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक झाल्यावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा मसुदा तयार करून त्याच्यावर 15 भाजप नगरसेवकांच्या सह्या घेतल्या.

2 सोमवारी किंवा मंगळवारी तो दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. असे असले तरी भाजप गोटात सगळेच आलबेल आहे, अशी स्थिती मात्र नक्कीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT