Madgaon Bus Stand
Madgaon Bus Stand Dainik Gomantak
गोवा

पहिल्याच पावसात कदंब बसस्थानकाचे पत्रे फुटले

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील कदंब बस स्थानकावरील शेडचे पत्रे फुटले असल्याने या बस स्थानकाला पहिल्या पावसाळ्यात गळतीला सुरुवात झाली आहे. बस स्थानकावर अनेक ठिकाणी गळती होत असल्याने बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. स्थानकावरील शेडची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

दक्षिण गोव्यातील महत्त्वाच्या अशा या मडगाव बस स्थानकावर राज्य तसेच आंतराज्य मार्गावरील बस थांबा घेत असतात. या बस स्थानकावर सतत प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणाहून सावर्डे, काणकोण, केपे, फोंड्यातून प्रवासी कामानिमित्त येतजात असतात. त्यामुळे गळक्या छतामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आपली बस येण्याची वाट पाहणाऱ्यांना या बसस्थानकार विसावा घेताना पावसाच्या सरींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच बस स्थानकावरील शेडची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी बोलताना मडगाव बस स्थानक व्यवस्थापक गिरीश गावडे यांनी दुरुस्तीचे काम सुरु झाल्याचं सांगितलं आहे. शेड दुरुस्तीचं किरकोळ काम कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Farmer : गोमूत्र फवारणीमुळे काजू उत्पादनात वाढ; मिलिंद गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी

Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

Loksabha Election 2024 : सावर्डेतून भाजपला मिळवून देणार २० हजार मताधिक्‍य; भाजप मंडळाची ग्‍वाही

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

SCROLL FOR NEXT