Madgaon Encroachment Dainik Gomantak
गोवा

मडगावात विक्रेत्यांकडून पदपथावर अतिक्रमण

पादचाऱ्यांना मनस्ताप; पालिकेने कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील सार्वजनिक पदपथावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले असून या ठिकाणी कपडे , पात्रदाणे , पावसाळ्यातील साहित्य या बरोबर इतर माल ठेवून या पदपथ अडवले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी खुले आम विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे या पदपथांवरून पादचाऱ्यांना ये जा करणे कठीण होऊन बसले आहे. मडगाव पालिकेने या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आर्थिक राजधानी असलेले मडगाव शहर व्यावसायिक उलाढालीचे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण गोव्यातील लोक या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करतात. याबरोबरच मडगाव सभोवतालच्या भागातील ग्राहकही आपल्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी शहरात येत असतात, या ग्राहकांना शहरातील पदपथांवरूनच येजा करावी लागते. मात्र, अनेक ठिकाणी या पदपथांवर किरकोळ विक्रेत्यांनी तयार कपडे, पात्रदाणे, पावसाळ्यातील साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे.

पिंपळकट्टा परिसर, रोपाआळ परिसर, गांधी मार्केट येथील काही ठिकाणे, न्यू मार्केट परिसरातील पदपथ या विक्रेत्यांनी व्यापले आहेत. या ठिकाणी सतत फेरीवालेही आपला माल घेऊन फिरत असतात. त्यामुळे येथील मुख्य बाजारातील कर भरणा करणाऱ्या दुकानदारांना ग्राहक मिळत नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील दुकानदारांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT