Madgaon Dainik Gomantak
गोवा

Madgaon News : मडगाव येथील उघड्यावरील थर्माकोल पेट्यांमुळे धोका : मिलाग्रेस फर्नांडिस

Madgaon News : पालिकेने कारवाई करण्याची मागणी; नागरिकांना नाहक त्रास

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon News :

सासष्टी, थर्माकोल पेट्यांवर केंद्र सरकारने देशभर बंदी घातलेली आहे. त्यामुळे अशा पेट्या उघड्यावर टाकणे धोकादायक आहे. जर या पेट्यांना आग लागली तर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती समाजसेवक मिलाग्रेस फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

येथील एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये उघड्यावर फेकून दिलेल्या अनेक थर्माकोलच्या पेट्या दिसून येतात. अशा पेट्या टाकण्यासाठी मडगाव पालिकेने व्यवस्थाही केली आहे. याबाबत फर्नांडिस यांनी सांगितले की, या पेट्यांमधून मासळी आणली जाते व मासळी संपल्यावर या पेट्या उघड्यावर फेकल्या जातात.

जर या पेट्यांना आग लागली तर जवळच असलेल्या माडेल, मुंगुल, सुरावली गावातील लोकांना यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. पालिकेने याकडे लक्ष द्यावे व लगेच कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेतात भराव, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

दरम्यान, जवळच असलेल्या शेतामध्ये मातीचा भराव घातला जात असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता मिलाग्रेस यांनी व्यक्त केली. ही शेतजमीन स्थानिक शेतकऱ्यांची आहे, ती बुजवून त्या ठिकाणी स्थलांतरित लोकांसाठी झोपड्या उभारण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ही माती इथे आणून टाकण्यास एसजीपीडीएने सांगितले असल्याचे माती आणून टाकणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरने सांगितल्याचा दावा मिलाग्रेस यांनी केला. सरकारने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT