lumpy skin disease Dainik Gomantak
गोवा

Lumpy skin Disease : अखेर ‘लम्पी’चा गोव्यात शिरकाव; 8 गुरांना बाधा

लम्पी विषाणुचा प्रादुर्भाव गोव्यात पोहोचला असून 15 नमुन्यांची चाचणी केली असता आठ गुरांना तो आजार झाल्याचे स्पष्ट झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Lumpy skin Disease : लम्पी विषाणुचा प्रादुर्भाव गोव्यात पोहोचला असून 15 नमुन्यांची चाचणी केली असता आठ गुरांना तो आजार झाल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक प्रकरणे फोंडा तालुक्यात आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तीन मिश्‍किता यांनी दिली. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

लम्पीसंदर्भात गोव्यात गणेशचतुर्थीपूर्वी लसीकरण सुरू करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. लम्पीचा जास्त प्रादुर्भाव गाय आणि बैलांवर होत आहे. असे मिश्‍किता यांनी स्पष्ट केले.

23 सप्टेंबर रोजी इतर राज्यांतून गुरे आणण्यास बंदी आणण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. त्यापूर्वी शेजारच्या राज्यातून आणलेल्या गुरांमध्ये लम्पी सापडला होता. त्यातील गाय ओळखून तिला विलगीकरणात ठेवले आहे. लम्पी रोग हा गोचिड आणि माशांद्वारे पसरतो. यासंदर्भात सर्व गोशाळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी सांगे तालुक्यातील नेत्रावळी गावात लम्पीने थैमान घातले होते, असे मिश्‍किता यांनी सांगितले.

लम्पी हा रोग केवळ गुरांमध्ये पसरतो. माणसांत याचा संसर्ग नाही. दूध किंवा मांस एकदा उकळल्यानंतर त्यातील जंतू मरून जातात. त्यासाठी दूध गरम केल्यानंतरच पिण्याची सूचना आम्ही केली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तीन मिश्‍किता यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आम्ही पोर्तुगीज शासित गोव्यात जन्मलो, आम्ही भारतीय आहोत का'? प्रश्नाने अधिकारी चक्रावले; विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कोर्टात

Cooch Behar Trophy: ऑल आऊट 125 नंतर, 3 बाद 54; गोव्याला मोठ्या आघाडीसह विजयाची चाहूल, उत्तर प्रदेशचा संघ पिछाडीवर

Goa BJP Candidate List: भाजपची तिसरी यादी होणार जाहीर! कोण असणार ते 21 जण? उत्सुकता वाढली..

Goa Politics: खरी कुजबुज; दामूची वॉर्निंग....

Omkar Elephant: ‘ओंकार’चा खेळ कधी संपणार? कवाथे, केळींबरोबर 2 वाहनांचे नुकसान, मोपा-उगवेतील संतप्त शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT