Luizinho Faleiro said leaves Congress but I am Congressman Dainik Gomantak
गोवा

Luizinho Faleiro: काँग्रेस सोडली तरी 'आय ॲम कॉंग्रेसमन'

गोव्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी प्रवेशाबाबत काहीच सांगितले नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी आज आपण मोठी घोषणा करणार असल्याचा गाजावाजा केला होता. मात्र सकाळी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा तेवढा दिला. पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करण्या बाबत काहीही सांगितले नाही. आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते तृणमूल पक्षामध्ये दाखल होणार असल्याची सर्वत्र जाहीर चर्चा होती .मात्र त्या चर्चाना फाटा देत आपण लवकरच आपला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच आपण काँग्रेस पक्ष सोडलेला असला तरी आपण काँग्रेसमन आहे असे सांगून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक आदी काँग्रेसचा राजीनामा दिलेले पदाधिकारी उपस्थित होते. आपण कुठल्या पक्ष निवडणूक लढवणार की नाही ते व कुठल्या पक्षात दाखल होणार आहे ते लवकरच तुम्हा लोकांना सांगू असेही पत्रकारांना त्याने सांगितले .

२०१७ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस कडे २१ आमदार यांचं पाठबळ होतं व आपण त्या वेळी काँग्रेसच्या दिल्लीतील कायदा विभागाला विचारणा केल्यानंतर राज्यपालांना पत्र देण्याचे सांगितले. आपण पत्रही तयार केले होते मात्र गोव्यात असलेल्या काँग्रेसच्या निरीक्षकांनी आपणास राज्यपालांना पत्र देण्यास अडवले असे फालेरो यांनी सांगितले.

हे सांगण्यात साडेचार वर्षे का लागली? या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले .आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला त्याच बरोबर गोव्याला राज्याचा दर्जा मिळून दिल्याचेही त्यांनी सांगितले.एकूणच फालेरो यांची आजची पत्रकार परिषद एक फुसका बार ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT