Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

Trinamool Congress: लुईझिन फालेरोंचा तृणमूलमधून काढता पाय!

राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला.

दैनिक गोमन्तक

लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) आणि तृणमूल काँग्रेस टीएमसी TMC पक्षश्रेष्ठीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. पक्षाच्या उमेदवारीवर फालेरो सहा महिन्यांपूर्वीच राज्यसभेत पोहोचले होते, परंतु त्यांची कारकीर्द संपुष्टात येणार असे दिसते. कारण त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून विजय सरदेसाई यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास फालेरो यांनी नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि वरिष्ठ नेते मंडळी त्यांच्यावर नाराज आहेत. फालेरो यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन केले नव्हते, फातोर्डा येथून माघार घेतल्यानंतर स्वतःच्या नावेली मतदारसंघातही प्रचारासाठी ते पोहोचू शकले नाहीत. म्हणून पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राज्यसभेतील तृणमूलचे संसदीय नेते डेरेक ओब्रायन यांनी फालेरो यांना राज्य समितीतून वगळल्यानंतरही ते पक्षाचे सदस्य आहेत का, असे प्रश्‍न केल्यानंतर फोलेरो यांना सन्माननीय व्यक्ती असल्याचे ओब्रायन म्हणाले होते. तृणमूल काँग्रेस आणि फालेरो यांच्यातील मतभेद जानेवारी 2022 मध्ये पुन्हा सुरू झाले. अभिषेक बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत फातोर्डा येथून फालेरो यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर फालेरो यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपले नाव मागे घेतले. राज्यात पक्षाची पुनर्बांधणीसाठी 7 सप्टेंबर रोजी नवीन 40 सदस्यीय राज्य समितीची घोषणा केली, परंतु त्यातून फालेरो यांना वगळण्यात आले होते.

विधानसभा निवडणूक झाल्यापासून फालेरो जणू गायबच झाले आहेत. राज्याशी निगडित प्रश्‍न ते राज्यसभेत उठवताना दिसतात, परंतु पक्षात ते एकाकी पडले असून त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांनी अगोदरच पक्षाला रामराम ठोकला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे पक्षाने फालेरो यांना आपल्या पणजीतील मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमिफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SIR Controversy: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिशाभूल, प्रसिद्धीपत्रकातील अनेक मुद्द्यांवर मौन; 'सिटीझन्स मॉनिटर-गोवा'तर्फे आरोप

SCROLL FOR NEXT