Goa crime  Dainik Gomantak
गोवा

त्याला गर्लफ्रेन्डच्या मोबाईलमध्ये जीवलग मित्रासोबतचे फोटो दिसले अन् दोघांत भांडण झाले; रोशिनीच्या खून प्रकरणात 'लव्ह ट्रँगल'

Love Triangle Crime: राज्यात सध्या धारबांदोडा येथे झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. या प्रकरणी आता नवनवे खुलासे होत आहेत. बंगळुरु येथील रोशीनाचा संजय केविन नावाच्या प्रियकराने जीव घेतला.

Manish Jadhav

फोंडा: राज्यात सध्या धारबांदोडा येथे झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. या प्रकरणी आता नवनवे खुलासे होत आहेत. बंगळुरु येथील रोशीनाचा संजय केविन नावाच्या प्रियकराने जीव घेतला. संजय सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. संजय आणि त्याचा मित्र रोशिनीचे चांगले मित्र होते. मात्र संजयच्या संशयाची रोशिनीला किंमत मोजावी लागली.

संजय आणि रोशिनी गोव्याला निघाले

दरम्यान, गोव्याकडे (Goa) निघतानाही संजय असाच निघाला होता. तो घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी रोशिनीकडे त्याची चौकशी केली. त्यानंतर तडक रोशिनीने संजयला कॉल केला. त्यावेळी त्याने रोशिनीला आपण हुबळीला असल्याचे सांगितले.

रोशिनीने त्याला कॉलवरच हुबळीलाच थांब असे सांगितले. आपण दोघे मिळून गोव्यासाठी निघूया असेही कॉलदरम्यान तिने त्याला सांगितले. संजय बंगळुरुहून हुबळीला मोटारसायकलने पोहोचला होता. मात्र हुबळीहून त्याने गोव्याला मोटारसायकलऐवजी बसने जायचे ठरवले. रोशिनीने डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून बसचे तिकीट काढले.

बसमध्येच तणातणी सुरु झाली!

रोशिनी आणि संजय यांच्यात गोव्याला जातानाच बसमध्ये तणातणी सुरु झाली. जेव्हा संजयने रोशिनीचा मोबाईल घेतला तेव्हा तिच्या फोनमध्ये त्याला पूर्वीच्या जीवलग मित्रासोबतचे फोटो दिसले. ते पाहून त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु झाले. मात्र यादरम्यान त्यांच्या या वादावादीचा त्रास बसमधील इतर प्रवाशांना होत होता.

त्यांच्यातील वाढती तणातणी आणि इतर प्रवाशांना होणारा त्रास पाहता कंडक्टरने दोघांनाही पिळये येथेच बसमधून खाली उतरण्यास सांगितले. कंडक्टरने खडसावल्यानंतर ते दोघेही भांडत-भांडत जेव्हा प्रतापनगर येथे उतरले तेव्हा रविवारी दुपारचे साडेचार वाजले होते.

संजयने रोशिनीचा घात केला

प्रतापनगरमध्ये उतरल्यानंतर वाद नको म्हणून रोशिनी संजयपासून दूर जात होती. एक कच्चा रस्ता तिथून लोकवस्तीकडे जात होता. संतापातून संजयने तिला तिथेच झाडीत नेले. रागातून काजूच्या झाडाखाली त्याने रोशिनीचा घात केला. त्याने साडेसहाच्या सुमारास सुरीने तिचा गळा कापला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'त्यानं' माकडांनाही लावलं पळवून! डोकं हॅंग करणारा व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

Shubhanshu Shukla: अभिनंदन! 18 दिवसांचे मिशन पूर्ण करुन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

LA Olympics 2028 Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चे वेळापत्रक जाहीर, 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा थरार!

SCROLL FOR NEXT