Film City Project  Dainik Gomantak
गोवा

Film City Project : लोलये-भगवती पठारावर ‘फिल्म सिटी’ येणार?

गोमन्तक डिजिटल टीम

Film City Project : काणकोण, लोलयेतील भगवती पठारावर फिल्म सिटी उभारण्यासाठी मनोरंजन सोसायटीने लोलये कोमुनिदादच्या मालकीची २५० एकर जमीन ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासंबंधी मनोरंजन सोसायटीने लोलये कोमुनिदाद संस्थेला आपली मान्यता कळवून रितसर करार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

मात्र, कोमुनिदाद संस्थेने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लोलये येथील श्री केशव देवालयाच्या सभामंडपात भागधारकांची खास सभा बोलावली आहे.

या पठारावर यापूर्वी आयआयटी प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे हल्लीच हा प्रस्ताव कोमुनिदाद संस्थेने पाठविल्यानंतर झालेल्या ग्रामसभेत भगवती पठारावर कोणताच प्रकल्प नको, असा सूर ग्रामस्थांनी लावला होता.

कोमुनिदादच्या प्रस्तावास मान्यता

ऑक्टोबर महिन्यात मनोरंजन सोसायटीने राजपत्रात यासंबंधी ज्यांची १० लाख चौरस मीटर जमीन आहे त्यांच्याकडून फिल्म सिटीसाठी प्रस्ताव मागितले होते. त्याला अनुसरून लोलये कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांनी मनोरंजन सोसायटीकडे आपला प्रस्ताव पाठविला होता.

त्यासंदर्भात लोलये कोमुनिदाद संस्थेच्या भागधारकांची बैठक घेण्यात आली होती. आता हा प्रस्ताव मनोरंजन सोसायटीने मान्य केल्याने अंतिम निर्णय घेण्यासाठी भागधारकांची खास सभा बोलविण्यात आली आहे, असे कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT