OM Birla In Goa Dainik Gomantak
गोवा

OM Birla In Goa: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला गोव्यात दाखल, श्रम-धाम योजनेतील घरांचे होणार हस्तांतरण

0 कुटुंबांना मिळणार घरांच्या चाव्या; लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते हस्तांतरण

Pramod Yadav

OM Birla In Goa: सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या राज्यातील अनोख्या श्रम-धाम योजनेतील वीस घरांचे गुरुवारी (ता.15) लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासाठी ओम बिर्ला गोव्यात दाखल झाले आहेत. बिर्ला यांचे सभापती रमेश तवडकर, राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतील श्रम-धाम योजना मार्च महिन्यात सुरू झाली होती. आतापर्यंत ज्या रहिवाशांना पक्के छप्पर नाही, अशा वीस कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यात आले आहे. त्यांना गुरूवारी ओम बिर्ला यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार आहे.

गुरुवारी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात संध्याकाळी 04 वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात बिर्ला यांच्या हस्ते या घरांच्या चाव्या घरमालकांना देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्री उपस्थित राहतील, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

श्रम-धाम योजना राबविण्यासाठी बलराम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एक रुपया किंवा एक दिवस या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन सभापती तवडकर यांनी केले होते. त्यानंंतर राज्यभरातून आर्थिक मदत त्याचबरोबर श्रम करण्यासाठी कार्यकर्ते शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसांत काणकोणात राबले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT