Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : लोकांचा उत्साह मनोबल वाढवणारा : श्रीपाद नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

पणजी, लोकांमध्ये असा उत्साह मी याआधी कधीच पाहिला नव्हता. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या बळावर या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व विक्रम मोडित काढणार आहे.

१९९९ व २०१४ सालाप्रमाणे गोव्‍यातील दोन्ही जागा आम्‍ही निश्चितपणे जिंकू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.

पालये येथील श्री सातेरी महामाया पालयेकरीण देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर सलग सहाव्यांदा लोकसभा निवडणूक लढविणारे श्रीपाद नाईक कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी हळदोण्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो, भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर, उपाध्यक्ष फ्रँकी कारवाल्हो, हळदोणे जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती मनिषा नाईक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या दोन - तीन दिवसांत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होणार असून दिवसेंदिवस लोकांकडून प्रतिसाद वाढत आहे.

गेले सतरा दिवस मी वेगवेगळ्या मतदारसंघाला प्रचाराच्या निमित्ताने भेट देत आहे. लोकांचा उत्साह खरोखरच मनोबल वाढविणार असून येत्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने जिंकून येण्याची खात्री आहे, असे श्रीपाद नाईक पुढे म्हणाले.

श्रीपाद नाईक यांनी हळदोणे मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान धुळेर, म्हापसा येथील श्रीराष्ट्रोळी देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतल्यावर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर हळदोणे मतदारसंघात येणाऱ्या म्हापसा नगरपालिकेच्या वार्ड क्र. ७ मध्ये अल्पसंख्यांकांना संबोधित केले.

त्यानंतर साईनगर येथील श्रीसाईबाबा मंदिरात झालेल्या बैठकीत हळदोण्यातील विविध मंदिरांच्या समिती सदस्यांबरोर त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार ग्लेन टिकलो यांच्यासह महानंद अस्नोडकर, फ्रँकी कार्वाल्हो, श्रीमती मनिषा नाईक, हळदोणे भाजप मंडळ अध्यक्ष विनय चोपडेकर, सुनिल खडे, कार्ल डिसोझा, साईबाबा देवस्थानचे अध्यक्ष दयानंद नाईक आणि हळदोण्यातील अन्य देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीपाद नाईक यांनी नंतर कारोणा येथे श्रीदेवी भगवती, किटला येथे श्रीदेव साखळेश्वर भगवती देवस्थान व पडवळ, खोर्जुवे येथे श्रीसातेरीचे दर्शन घेतले. बस्तोडा पंचायत सभागृहात नारीशक्तीशी संवाद साधून नाईक यांनी आपल्या हळदोणे मतदारसंघातील पहिल्या टप्प्याच्या प्रचारफेरीची सांगता केली.

‘श्रीपादभाऊ स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी’

संपूर्ण देशात एक स्वच्छ प्रतिमा असलेला राजकारणी म्हणून श्रीपादभाऊ परिचित आहेत. पंच, सरपंच, आमदार ते केंद्रीय राज्यमंत्री ही त्यांची वाटचाल अत्यंत प्रेरणादाई आहे. हळदोण्यात त्यांनी खूप विकासकामे केलेली आहेत.

उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण खासदारांमध्ये त्यांचा दहावा क्रमांक लागतो, यावरून त्यांनी केलेल्या विकासकामांचा अंदाज येतो. हळदोणे मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांना किमान दोन ते तीन हजारांचे मताधिक्य आम्ही मिळवून देऊ, अशी ग्वाही हळदोण्याचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT