Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : सांगेत भाजपच्या प्रचाराची ‘धुळवड’; पल्लवींनी घेतले दैवतांचे दर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सांगे, काँग्रेस व इतर पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नसले, तरी भाजपने ऐन शिमगोत्सवात लोकसभा निवडणूक प्रचाराची धुळवड सुरू केली आहे.

भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सांगे मतदारसंघातील आराध्य दैवत श्री दामोदर आणि पाईक देवांचे दर्शन घेऊन सांगे येथील नगरपालिका सभागृहात कार्यकर्ता संमेलन घेऊन प्रत्यक्षरीत्या प्रचारकार्याला सुरवात केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, वासुदेव मेंग गावकर, अल्का फळदेसाई, नगराध्यक्ष अर्चना गावकर, मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, सांगेतील नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य आणि कार्यकर्त्यांचा ताफा संमेलन ठिकाणी उपस्थित होता.

सांगेत कार्यकर्ता संमेलनातून पल्लवी धेंपे यांच्या प्रचार कार्याच्या शुभारंभ करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षाला खुले आवाहन देत राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या साठ वर्षांच्या कालावधीत काय काम केले ते सांगावे आणि भाजप सरकारने दहा वर्षांत किती विकासकामे केली त्याची जंत्री वाचायला सुरवात केली.

वाटल्यास दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा घेतला. मोदी सरकारने आणि पर्यायाने गोवा सरकारने शेकडो योजना चालीस लावून गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षाने एक तरी योजना चालीस लावली आणि ती आजपर्यंत चालू आहे हे दाखवून द्यावे, असेही आव्हान त्यांनी दिले.

‘कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य करावे’

सांगे मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. गेल्यावेळी भाजपाला मिळालेल्या मतापेक्षा यंदा अधिक मते मिळविण्यासाठी सांगेतील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

सांगे हा कार्यकर्त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे दहा हजार मतांची आघाडी सांगेतून मिळवून देणार असल्याचा आशावाद व्यक्त करीत पल्लवी धेंपे या उत्तर गोव्याच्या मतदार असल्या तरी त्यांचे बालपण दक्षिण गोव्यात गेले आहे. व्यवसाय, नातेगोते आणि सगेसोयरे संपूर्ण दक्षिण गोव्यात विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मोदींच्या विश्वासास पात्र ठरणार’

मोदी सरकारने आपल्याला उमेदवार म्हणून सन्मान दिल्याबद्दल केंद्रीय तसेच राज्यातील नेत्यांचे आभार मानत उमेदवार पल्लवी धेंपे यांनी महिलांचे सशक्तीकरण हे केवळ बोलून न दाखविता प्रत्यक्ष कृती करून दाखविणारा भाजप पक्ष असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दक्षिण गोव्याची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासला पात्र ठरण्यासाठी तुम्ही सर्वजण आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT