goa Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Loksabha Election 2024 : देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्याच्या निवडणुकीत एनडीए पिछाडीवर असल्याचे ते म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

वास्को, लोकसभा निवडणुकीत भाजप (एनडीए) आघाडी ४०० पार काय, २०० चा आकडासुद्धा पार होणे मुश्कील असल्याचे काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांनी सांगितले. देशात काँग्रेस सरकार पुढील ५० वर्षे येणार नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वक्तव्य केले होते.

त्याला प्रत्युत्तर काँग्रेस नेते डॉ. थरूर यांनी दिले. देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत इंडिया आघाडी वर्चस्व प्राप्त करीत असल्याचे ते म्हणाले.

देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्याच्या निवडणुकीत एनडीए पिछाडीवर असल्याचे ते म्हणाले.

डॉ. थरूर यांचे गुरुवारी (ता. २) गोव्यातील दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नेते एल्विस गोम्स व इतरांनी थरूर यांचे स्वागत केले. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून भाजप २०० पार करणे सध्याच्या स्थितीत मुश्कील असल्याचे सांगितले. दरम्यान, एका सभेत डॉ. थरूर यांनी काँग्रेसच दुहेरी नागरिकत्व बहाल करेल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT