Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : हळदोणेत भाजप-काँग्रेसची कसोटी! सरकारविरोधाचे वारे

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा, ख्रिश्चन मतदारांचा प्रभाव असलेल्या हळदोणे मतदारसंघातून २०१९च्या लोकसभेवेळी भाजपची आघाडी घटली होती. त्यांना केवळ ५३७ मतांची आघाडी मिळाली होती.

मागील काही काळात बदलेली समीकरणे व राजकीय स्थितीमुळे, भाजपसमोर मतांच्या आघाडीचे अंतर वाढविण्यापेक्षा ते अबाधित राखण्याचे आव्हान आहे. कारण, हळदोणेत काही प्रमाणात अँटी इन्कम्बन्सीचे वारे वाहत आहे. आता काँग्रेस अन् ‘आरजी’ समर्थक या परिस्थितीचा किती लाभ उठवतात की पुन्हा भाजप हळदोणेतील तुटपुंज्या आघाडीचे वर्चस्व राखते, हे निकालादिवशीच स्पष्ट होईल.

हळदोणेचे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा आणि भाजपचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यामध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारास या संबंधित मतदारसंघातून आघाडी मिळवून देण्याची राजकीय कसोटी आहे. आता

या राजकीय सामन्यात कोण बाजी मारतो अन् कोण आपले अस्तित्व टिकवतो, यातून दोघांची राजकीय बलस्थाने दिसतील.

हळदोणेत काँग्रेस, भाजप तसेच ‘आरजी’ या तिन्ही राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. भाजपचे श्रीपाद नाईक व काँग्रेसचे अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी नुकताच, हळदोणे मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय चिकलफेक केली.

दुसरीकडे, आरजी ‘सायलंट मोड’वरच प्रचाराचे घोडे दामटत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, काँग्रेसचे उमदेवार अ‍ॅड. खलप म्हणतात की, उत्तरेतून आपण ४० हजारांच्या मताधिक्क्याने जिंकू, तर भाजपचे श्रीपाद नाईक यांच्या दाव्यानुसार ते १ लाखाच्या मताधिक्क्याने पुन्हा सहाव्यांदा खासदार होतील.

सध्या प्रचाराची संपूर्ण धूरा हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्याच खाद्यांवर आहे. कारण अ‍ॅड. फेरेरा हे उत्तरेतील एकमेव काँग्रेसचे आमदार असल्याने त्यांना आपल्या हळदोणा मतदारसंघासह इतरत्र लक्ष घालावे लागेल.

कांदोळकरांची भूमिका महत्त्वाची

हळदोणेतून कोणता राजकीय पक्ष आघाडी मिळवतो यावर या मतदारसंघातील नेत्यांची राजकीय विधानसभेचे भवितव्य अवंलबून राहील. काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा व भाजपाचे माजी आमदार ग्लेन टिकलो दोन्ही नेते हे ख्रिश्चन समुदायातील आहेत.

त्यामुळे ख्रिश्चन मतदारांना आपापल्या पक्षाकडे आकर्षित करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. दुसरीकडे, माजी आमदार किरण कांदोळकर यांची राजकीय भूमिका या नेत्यांमधील चढाओढीच्या अंतराचे कारण बनू शकते. गत २०२२च्या विधानसभा निवडणुकीत कांदोळकरांनी ‘टीएमसी’च्या तिकिटावर हळदोणेतून ३,६४७ मते मिळवली होती. ही मते ‘तृणमूल’ म्हणून नव्हे तर किरण कांदोळकर म्हणून त्यांना पडली होती.

कॉंग्रेसला भोवणार नाराज भिकेंची अलिप्तता

एकीकडे, बार्देशमध्ये भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज तसेच लोकप्रतिनिधींची मोठी मांदियाळी आहे. परंतु, काँग्रेसकडे आमदारांचा अभाव व कार्यकर्त्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. तसेच, नेत्यांमधील अंतर्गत राजकीय कलहामुळे प्रचारावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

काँग्रेसचे नेते विजय भिके यांना तिकिट डावलल्यापासून ते प्रचारात सहभागी झालेले दिसले नाहीत. कारण, भिके हे ‘ग्राउंड’वर उतरून काम करणारे पक्षाचे जुने खंबीर नेते. त्यामुळे त्यांची उणीव दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT