Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem News : सांगेत ईव्हीएम मशिन मतदान प्रात्यक्षिक

Sanguem News : कोणतीही सूचना, तक्रारी असल्यास प्रात्यक्षिक ठिकाणी आपली तक्रार लेखी स्वरूपात करून देता येईल, अशी माहिती सांगेचे मामलेदार गौरव गावकर यांनी पत्रकारांना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem News : सांगे मामलेदार कार्यालयात ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रात्यक्षिक तपासणी करण्याची संधी मतदारांना दिली असून मतदान केल्यानंतर कोणत्याही तक्रारी राहू नये यासाठी मतदार आपले मतदान केल्यानंतर त्यांचे मतदान कोणत्या चित्राला केले त्याची पडताळणी मतदाराला त्या क्षणी जाणून घेता येते.

कोणतीही सूचना, तक्रारी असल्यास प्रात्यक्षिक ठिकाणी आपली तक्रार लेखी स्वरूपात करून देता येईल, अशी माहिती सांगेचे मामलेदार गौरव गावकर यांनी पत्रकारांना दिली.

लोकसभा निवडणूक जवळ आली असून मतदार आपले मतदान करताना आपले मत वाया जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्याच धर्तीवर आता मतदानाचा हक्क बाजाविताना आपले मत कोणत्या चित्राला दिले त्याची खात्री करून घेण्यासाठी खास चित्रणाद्वारे प्रत्येक मतदाराला तपासून पाहता येते.

सांगेच्या नागरिकांनी या प्रात्यक्षिक मतदानाचा अनुभव घेण्याचे आवाहनही मामलेदार गौरव गावकर यांनी केले आहे. यासाठी आपल्या कार्यालयाच्या बाहेर खास कक्ष उघडण्यात आला असून नागरिकांना यांत्रिक मतदानाचा योग्य वापर कसा करावा व खास करून नवीन मतदाराला या प्रात्यक्षिक मतदान यंत्राचा उपयोग करून घेता येईल.

आतापर्यंत या प्रत्यक्षिकांना चांगला प्रतिसाद लाभला असल्याचेही मामलेदार गावकर यांनी सांगितले. यावेळी मतदान केंद्र प्रमुख कृष्णा वेळीप या वेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT