जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रुम gomantak digital team
गोवा

Loksabha Election 2023: लोकसभा निवडणुकीची लगबग; नवीन ‘ईव्हीएम’ राज्‍यात दाखल

Ganeshprasad Gogate, गोमंतक ऑनलाईन टीम

Loksabha Election 2023: लोकसभा निवडणूक मे २०२४ साली होणे अपेक्षित असले, तरी त्या नियोजित वेळेपेक्षा लवकरही होऊ शकतात, असे भाकित केले जात आहे. त्यातच दक्षिण गोव्यात २०० बॅलेटस युनिट आणि ८० कंट्रोल युनिट मशीन्स आले आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने त्यांची तपासणी करून जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये सध्या ही ईव्हीएम मशीन्स ठेवली आहेत.

निवडणूक आयोगाने टप्प्या-टप्प्याने इव्हीएम मशीन्स सर्व राज्यांमध्ये पाठविण्यास सुरवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगही निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

गोव्यात ही मशीन्स आल्यावर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीतील स्ट्रॉंग रुममध्ये इव्हीएम मशीनची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई उपस्थित होते.

मशिन्स पोलिसांच्या निगराणीखाली

इव्हीएम मशीन्स गोव्यात दाखल झाल्याबरोबर त्यांचे स्कॅनिंग करून तपासणी करण्यात आली. आता ती जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्ट्रॉंग रूमबाहेर २४ तास कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT