मोरजी: धारगळ पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या गॅम्बलिंग झोनविषयी सरकारने फेरविचार करण्याची गरज आहे. धारगळ-ओशालबाग येथील चार लाख चौरस मीटर जागेत तारांकित हॉटेल व गॅम्बलिंग कॅसिनो प्रकल्प होऊ घातला आहे. प्राथमिक स्तरावर या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिलेली आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
गॅम्बलिंग व्यवसायातून सरकारला करोडो रुपये महसूल मिळणार आहेत. त्यासाठी कॅसिनो व तारांकित हॉटेल सुरू करण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. डेल्टा प्लेजर कोट कंपनीने धारगळ येथे चार लाख २७ हजार ५० चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या प्रकल्पातून ४ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी खोटी हमी कंपनीने सरकारला दिली आहे.
या प्रकल्पात पंचतारांकित हॉटेल, कन्व्हेन्शन सेंटर, मल्टिप्लेक्स सिनेमा, रिटेल एरिया, इलेक्ट्रॉनिक कॅसिनो, वॉटर पार्क, बँक सुविधा, चिल्ड्रन्स मनोरंजन एरिया यांचा समावेश आहे. या प्रकल्पाची जमीन अधिकतर शेतजमीन तसेच तिळारी पाटबंधारे क्षेत्रातील आहे. पेडणे हा सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारा तालुका म्हणून आंतरराष्ट्रीय चमकत असला, तरी भविष्यात गॅम्बलिंग झोनमुळे या संस्कृतीला बाधा येईल, अशी भीती जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.