Madkai Panchayat Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Madkai Panchayat: नोकरीत स्थानिकांना ‘प्राधान्य द्या’; मडकई ग्रामसभेचा ठराव

Madkai Panchayat Gram Sabha: पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने औद्योगिक वसाहतीतील बांधलेल्या बोअरवेलची पाहणी करण्याची सूचनाही ग्रामस्थांनी केली

गोमन्तक डिजिटल टीम

मडकई: मडकई पंचायतक्षेत्रातील गोमंतकीय नागरिकांना येथील औद्योगिक वसाहतीतील रोजगारात प्रथम प्राधान्य मिळावे, अशी जोरदार मागणी मडकई पंचायतीच्या करण्यात आली. मडकई आयडीसीत बहुतांश कंपन्या स्थानिकांना डावलून गोव्याबाहेरील लोकांना थेट रोजगार देतात, असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. या विषयावर जोरदार चर्चा होऊन स्थानिकांना शंभर टक्के प्राधान्य द्यावे, असा ठराव घेण्यात आला.

कर्नाटकात ज्याप्रमाणे तेथील काँग्रेस सरकारने स्थानिकांना नोकऱ्यांत शंभर टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर मडकई पंचायतीतील नागरिकांनाही रोजगारात प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मडकई पंचायतीची ग्रामसभा सरपंच शैलेंद्र पणजीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंचायत सदस्य तसेच पंचायत सचिव उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरवातीला पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. त्यानंतर अनेक विषयांवर चर्चा झाली.

राज्यात बेरोजगारीचा प्रश्‍न सतावत आहे. त्यातच मडकई, कुंडई आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती असून त्यात मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उभे राहिले आहेत. या औद्योगिक प्रकल्पात स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या, अशी सूचना राजेश नाईक तसेच इतरांनी केली.

पंचायतक्षेत्रात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने औद्योगिक वसाहतीतील बांधलेल्या बोअरवेलची पाहणी करण्याची सूचनाही ग्रामस्थांनी केली. पाण्याची पातळी कमी होत असल्याने स्थानिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले, त्यामुळे हा निर्णय झाला.

पुढील ग्रामसभेत‘ वाढीव घरपट्टी’वर विचार

पंचायतक्षेत्रातील घरांच्या घरपट्टीवर चर्चा झाली. गेला बराच काळ पंचायतक्षेत्रातील घरपट्टी तसेच व्यावसायिक आस्थापनांचा कर वाढवण्यात आलेला नाही, घरपट्टीसंबंधी एक सर्वेक्षण करण्यात आले आहे, मात्र स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच त्यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे यासंबंधी पुढील ग्रामसभेत विचारविनिमय करण्यात येणार आहे. अन्य विषयही ग्रामसभेत चर्चेला आले त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या प्रश्‍नांना सरपंच शैलेंद्र पणजीकर, पंचायत सचिव व इतर पंचसदस्यांनी समर्पक उत्तरे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT