Old bridge Dainik Gomantak
गोवा

Goa: पाली-शेळपवासीयांचा जीव लागला टांगणीला!

ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील पाली-देऊळवाडा येथे असलेल्या लाकडी साकवाच्या जागी पक्का पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई: ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील पाली-देऊळवाडा येथे असलेल्या लाकडी साकवाच्या जागी पक्का पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाली-देऊळवाडा येथून नानेली-शेळप येथे जाणे साकवामुळे सोयीस्‍कर होते. त्यामुळे येथे लाकडी साकव बांधण्यात आले आहेत. पावसाळा सोडल्‍यास अन्‍य दिवसांत नदी ओलांडून पायी जाता येते. पण पावसाळ्यात दरवर्षी लाकडी साकव बांधण्यात येतो. जीव धोक्यात घालून हा साकव ओलांडावा लागतो. म्‍हणूनच तेथे पक्का पूल बांधावा, अशी मागणी होत आहे.

(local resident of thane dongurlim goa demands for permanent bridge)

पाली-नानेली शेळप येथे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आहे त्यामुळे जर पूल बांधण्यात आला तर दुचाकीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या नदीवर बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरच पूल बांधला गेला तर गावातील लोकांची चांगली सोय होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्‍या असलेला लाकडी लाकडी साकव धोक्याचा आहे. त्यामुळे लोकांना जीव मिठीत धरून साकवावरुन जावे लागते. तो कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते. याची दखल घेऊन स्थानिक पंच तसेच आमदाराने लक्ष घालून पूल उभारण्‍यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

रोजच्‍या वाटेवर टपून बसलाय मृत्‍यू!

नदीच्या पलीकडे असलेल्या जमिनीत पाली गावातील नागरिकांची बागायती आहे. त्यामुळे या लोकांसाठी सदर वाट ही रोजचीच झालेली आहे. तसेच पावसाळ्‍यात पाण्याच्‍या प्रवाहामुळे नदीचे पात्र कमी-जास्‍त होत असते. परिणामी साकव ओलांडताना लोकांच्‍या मनात कायम भीती असते. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे या साकवावरून नानेली-शेळप, शिंगणे येथे जाण्‍यासाठीचे अंतर खूपच कमी पडते. अन्‍यथा गावाला वळसा घालावा लागतो. म्‍हणूनच या साकवाच्‍या जागी पुलाची उभारणी झाल्यास लोकांची चांगली सोय होऊन त्‍यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

मुलाबाळांचाही जीव धोक्‍यात : बुधाजी गावकर

पाली-देऊळवाडा ते नानेली-शेळप हा प्रवास आता आमचा नित्‍याचाच आहे. कारण पलीकडे आमची शेती, बागायती आहे. मुलाबाळांसह आम्‍हाला जीव मुठीत धरून धोकादायक लाकडी साकवावरून जावे लागते. हा साकव कधी कोसळेल किंवा कधी त्‍यावरून पाय घसरेल हे सांगता येत नाही. त्‍यामुळे या ठिकाणी पक्का पूल उभारून लोकांना दिलासा द्यावा तसेच भविष्‍यातील अनर्थ टाळावा, अशी मागणी एक स्‍थानिक ग्रामस्‍थ बुधाजी गावकर यांनी केली आहे. आमदाराने यात लक्ष घातले तर ही समस्‍या लवकर सुटेल, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

SCROLL FOR NEXT