cutting Down hills in goa Dainik Gomantak
गोवा

सडये शिवोलीत अवैधरित्या डोंगराची कापणी सुरुच

पंचायतीच्या आशीर्वादाने अवैध काम सुरु असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

दैनिक गोमन्तक

म्हापसा : अवैध डोंगर कापणी सुरु असल्याने सडये शिवोलीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. डोंगरावर असलेल्या झाडांचंही यामुळे मोठं नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे काम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही काम सुरुच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

सडये शिवोलीतील (Siolim) मायणावाडो परिसरात सर्व्हे क्रमांक 247 आणि 247/5 येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी सुरु आहे. या अवैध डोंगरकापणीला आता सडये शिवोलीतील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. मागील 10 दिवसांपासून या डोंगरात खोदकाम सुरु असून यात आतापर्यंत शेकडो फळझाडं आणि इतर झाडांचही मोठं नुकसान झालं आहे.

आतापर्यंत या अवैध डोंगरकापणीप्रकरणी पंचायत, प्रशासन आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. इतकंच नाही, तर वन खात्यालाही याची माहिती दिली आहे. मात्र कुणीही अजून कारवाईसाठी न आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या डोंगर कापणीमुळे विविध प्राणी, पक्षी यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पंचायतीच्या (Panchayat) आशीर्वादानेच हा सारा अवैध डोंगरकापणीचा प्रकार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT