Nirmala Sitharaman And Monoj Parab Dainik Gomantak
गोवा

Goa Bank क्षेत्रात स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्यावे!

पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषेचे प्रशिक्षण द्यावे.

दैनिक गोमंतक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बँक क्षेत्रात स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले होते. या वक्तव्याचे रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी स्वागत केले आहे.

पणजी येथे आज पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, प्रत्येक बँकेत नोकरभरती करताना स्थानिक भाषा ज्ञात असलेल्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. गोव्यात अनेक बँकांत कोकणी बोलता, समजता न येणारा नोकरवर्ग कामाला आहे आणि यामुळेच लोकांना तसेच कामगारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो.

गोव्यात 46 बँक आहेत. त्यात 12 पब्लिक सेक्टर, 17 खासगी क्षेत्रात तर 14 कॉर्पोरेट बँक्स आहेत. राज्यात एकूण 780 ब्रँच आहेत आणि त्यामध्ये सरकारने ठरवले तर कित्येक स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.

त्यामुळे बँकिंग क्षेत्रात स्थानिक भाषेलाच व स्थानिक भाषेची जाण असणाऱ्यांनाच प्राधान्य द्यावे, पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषेचे प्रशिक्षण द्यावे, बँकेतील पोस्टर्स, माहिती स्थानिक भाषेतच असावी इत्यादी मागण्यांचे पत्र सरकारला देण्यात येईल, असेही मनोज परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT