Goa Tourism  Gomantak Digital Team
गोवा

Panaji Illegal Businessmen: बेकायदेशीर शॅक्स व्यावसायिकांचे धाबे दणाणले

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका : उच्च न्यायालयाकडून दखल; कांदोळी-कळंगुटमधील 161 शॅक्स बंद

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : कांदोळी-कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सचालकांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा संंमती परवाना नसल्याने167 पैकी 161 शॅक्सना नोटीस बजावून मंडळाने त्यांचा व्यवसाय आजपासून बंद केला. या बेकायदेशीर सुरू असलेल्या शॅक्स व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती.

उच्च न्यायालयाने घेतलेल्या या गंभीर दखलीमुळे शॅक्सचालकांना दणका बसला आहे. इतर समुद्रकिनारीही असलेल्या शॅक्सचालकांची तपासणी करण्याचे निर्देश पर्यटन खाते व जीसीझेडएमएला दिल्याने इतर शॅक्सचालकांचे धाबे दणाणले आहेत. ज्या 161 शॅक्सचा व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी उत्तर गोवा जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाने करावी.

बंद करण्यात आलेले शॅक्स सुरू होणार नाहीत याची जबाबदारी जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. ज्यांनी मंडळाकडून संमती परवाना मिळविला आहे त्याचीही तपासणी केली जावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने पर्यटन खात्याला दिले आहेत. या शॅक्सचालकांनी आदेशाचे पालन केले आहे की नाही व संमती परवान्यासाठी केलेल्या अर्जांची माहिती व त्यावर घेतलेल्या निर्णयासंदर्भातचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवली आहे.

कळंगुट येथील रुबेन फ्रांको यांनी जनहित याचिकेद्वारे समुद्रकिनारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीच्या परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

प्रशासनाची डोळेझाक

समुद्रकिनाऱ्यावरील शॅक व्यवसाय कायदेशीर सुरू आहे की नाही याची जबाबदारी असलेल्या जीसीझेडएमए, पर्यटन खाते तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाने डोळेझाक केली आहे. या शॅक्सचालकांनी अंतिम परवाना मिळविलेला नाही तरी हा व्यवसाय बेकायदेशीर सुरू आहे, याबाबत उच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त करत टिप्पणी केली आहे.

अशी केली फसवणूक

पर्यटन खात्याकडून शॅक्स व्यवसाय सुरू करण्यासाठी शॅक्सचालकांना तात्पुरता परवाना दिला जातो. त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून ना हरकत घेण्याची गरज आहे. हे परवाने मिळाल्यानंतर त्यांनी जीसीझेडएएमएकडे शॅक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज करण्याची सक्ती आहे. मात्र, बहुतेक शॅक्सचालकांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा संमती परवाना मिळण्यापूर्वीच तात्पुरत्या परवान्यांच्या आधारे शॅक्स व्यवसाय गेल्या ऑक्टोबरपासून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT