Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture : कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त गोमंत विद्या निकेतनमध्ये ‘साहित्यिक नाट्यदर्शन’

कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त यंदा गोमंत विद्या निकेतनतर्फे जळगाव येथील ‘परिवर्तन’ या नाट्यसंस्थेतर्फे दोन दिवसीय ‘साहित्यिक नाट्यदर्शना’चा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Culture : कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त यंदा गोमंत विद्या निकेतनतर्फे जळगाव येथील ‘परिवर्तन’ या नाट्यसंस्थेतर्फे दोन दिवसीय ‘साहित्यिक नाट्यदर्शना’चा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जगभरातल्या स्त्रियांच्या जगण्याचा आकांत कवितेत मांडणारे जागतिक कीर्तीचे मराठी आणि इंग्रजी कवी अरुण कोल्हटकर यांच्या ‘भिजकी वही’ या काव्यसंग्रहाचे वाचिक अभिनयदर्शन मंगळवार, २८ रोजी सायंकाळी ७ वाजता संस्थेच्या फोमेंतो एम्फीथिएटरमध्ये सादर करण्यात येईल. सुदिप्ता सरकार, मंजूषा भिडे, प्रतीक्षा कल्पराज, सोनाली पाटील, जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील हे या नाट्यात्म दर्शनामध्ये सहभागी होणार आहेत.

गोमंत विद्या निकेतनने या आगळ्यावेगळ्या नाट्यदर्शनाचा दुर्लभ योग जुळवून आणला आहे. नाट्यरसिकांनी या विनामूल्य प्रयोगांचा आस्वाद घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

‘अमृता साहिर इमरोज’चा प्रयोग

बुधवार, १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता संस्थेच्या गोविंद (बाबा) कारे या पहिल्या मजल्यावरील मुख्य सभागृहात ‘अमृता साहिर इमरोज’ हा नाट्यप्रयोग याच संस्थेतर्फे सादर होईल. शंभू पाटील यांची संहिता, मंजूषा भेडे यांचे दिग्दर्शन व जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर, शंभू पाटील यांच्या अभिनयातून हे नाटक नाट्यरसिकांना अंतर्मुख करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT