Goa Waterfall  Dainik Gomanatak
गोवा

Goa Waterfalls: ‘ते’ धोकादायक धबधबे कोणते?

Forest Department: धोकादायक धबधबे कोणते याची यादी अजून सरकारकडून जाहीर झालेली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

वनखात्याने धबधब्यांवर जाण्‍यास बंदी लागू केल्‍यामुळे पर्यटक आणि स्थानिक लोक तीव्र नाराजी व्‍यक्त करत आहेत. खात्याने तयार केलेल्‍या धोकादायक धबधब्यांच्‍या यादीत मैनापी आणि साट्रे या प्रसिद्ध धबधब्यांचा समावेश आहे. परंतु इतर आठ धोकादायक धबधबे कोणते, याची यादी सरकारने जाहीर केलेली नाही.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्‍टीमुळे राज्यातील धबधबे ओसंडून वाहत होते. तेथील जोरदार प्रवाहामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. धबधब्यांवर बुडून मरण्याच्या वाढत्‍या घटना लक्षात घेऊन तेव्हा राज्य सरकारने काही धबधब्यांवर जाण्यास बंदी आणली होती.

यावर्षीही पाऊस सुरू झाल्यावर सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी राज्यातल्या पाणथळ ठिकाणी आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी लागू केली. या निर्णयामुळे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्‍यासह अनेकांनी नाराजी व्‍यक्त केली होती.

याबाबत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले होते की, खात्याने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून राज्यातले आठ धोकादायक धबधब्यांची यादी तयार केली आहे.

सध्‍या ती यादी मंत्रालयात पाठवून देण्‍यात आली आहे. आज पुन्‍हा एकदा त्याच वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ‘त्‍या’ आठ धोकादायक धबधब्यांच्या यादीवर सरकारकडून अजून शिक्कामोर्तब झाले नसल्‍याचे त्‍याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT