Liquor Shop on Aguada Fort  Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort : आग्वाद किल्ल्यावरील 'ते' मद्यालय बंद नाही झाले तर...फ्रिडम फायटर असोसिएशनची आक्रमक भूमिका

शिरोडकर यांनी मद्यालय बंद होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

Kavya Powar

निसर्ग संपन्नता लाभलेल्या गोव्यात अगदी वर्षभर पर्यटकांची रेलचेल सुरूच असते. अनेक पर्यटकांचे गोव्यात येण्याचे एक खास प्रयोजन म्हणजे मद्य प्राशन. खास मद्यासाठीच म्हणून इथे येणारे खूपजण असतात.

मात्र सध्या आग्वाद किल्ल्यावर सुरू असलेल्या मद्य विक्रीमुळे गोव्यात गदारोळ सुरू आहे. आग्वाद किल्ला हे इथल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. असे असले तरी या ठिकाणाला स्वत:चे असे विशेष महत्व आहे. आणि अशा ठिकाणी मद्य विक्री सुरू असल्यामुळे अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात नवजीवन सोसायटी ऑफ फ्रिडम फायटर असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आग्वाद किल्ला हा आपल्या प्रत्येकासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे. गोव्याला मुक्ती देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

अशा ठिकाणी मद्यालय असणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपण किमान स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आदर म्हणून तरी अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. त्यामुळे मी असोसिएशनतर्फे हे मद्यालय ताबडतोब बंद करण्याची मागणी करतो. त्याचबरोबर या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घालावे अशी विनंती करतो.

तसेच शिरोडकर यांनी मद्यालय बंद होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे गोवा समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून या मद्य विक्रीची छायाचित्रेच सोशल मीडियात पोस्ट केली आहेत.

गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिलेल्या आग्वाद किल्ल्यावर (Aguada Fort) मद्य विक्री केली जात आहे. याला परवानगी कुणी दिली? हे समोर आले पाहिजे. हे गोव्याचे नवे बिझनेस मॉडेल आहे का? यातून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला जात आहे, अशी टीका ॲड. अमित पालेकर यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT