Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लोलयेत जुगार अड्ड्यावर धाड, बंगल्यातून लाखोंचा ऐवज जप्त; मद्य व्यावसायिकाला नोटीस

Loliem Police Raid: काणकोण पोलिसांनी धाड घातल्यानंतर आता या प्रकरणी चौकशीस हजर राहण्यासाठी याच भागातील मद्य व्यावसायिक लिगोर डिसोझा याला नोटीस बजावली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: लोलये-पोळे येथे एका बंगल्यात चालू असलेल्या अड्ड्यावर काणकोण पोलिसांनी धाड घातल्यानंतर आता या प्रकरणी चौकशीस हजर राहण्यासाठी याच भागातील मद्य व्यावसायिक लिगोर डिसोझा याला नोटीस बजावली आहे.

काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आज ही नोटीस जारी केली असून उद्या त्याला पोलिस स्थानकावर हजर राहण्यास सांगितले आहे. २३ जुलै रोजी काणकोण पोलिसांनी पहाटेच्या वेळी या अड्ड्यावर धाड घालून हा जुगार चालविणाऱ्या सात कर्मचाऱ्यांबरोबर तब्‍बल ४० जणांना अटक केली होती.

यातील बहुतेक संशयित हे कारवार व अंकोला या भागातील असून कारवारहून मोठ्या प्रमाणावर लोक या काणकोणातील अड्ड्यावर येऊन जुगार खेळत असल्‍याचे या कारवाईतून उघड झाले होते. मागाहून हे सर्व संशयित जामिनावर मुक्त झाले.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, अटक केलेल्‍यांमध्‍ये रॉनी फर्नांडिस (२९) हा पोळे येथील स्‍थानिक असून बाकी सर्व संशयित हे कर्नाटकातील आहेत. दुलगळी-लोलये येथील तेल्‍मा नावाच्‍या महिलेचा बंगल्यावर हा जुगार चालू होता. या कारवाईत पोलिसांनी ५.२० लाख रुपये रोख, ५ लाख रुपये किमतीचे ४० मोबाईल, ६ लाख रुपयांची कर्नाटक नोंद झालेली एर्टीगा कार तसेच १ कॉम्‍प्‍युटर मॉनिटर असा एकूण १६.३५ लाखांचा ऐवज जप्‍त केला होता.

बंगला बहिणीच्या मालकीचा

ज्या बंगल्यात हा जुगारी अड्डा सुरू केला होता तो बंगला डिसोझा याच्या बहिणीच्या मालकीचा असून डिसोझा हाच हा अड्डा चालवीत होता, अशी माहिती अटक केलेल्या संशयितांनी पोलिसांना दिल्यानंतर आता पोलिसांनी अधिक चौकशी करण्यासाठी डिसोझा याला नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT