Linemen of Sattari Taluka were honored on the occasion of Lineman's Day on behalf of the Electricity Department Dainik Gomantak
गोवा

Valpoi : लाइनमननी सेवा देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी ; अभियंता तुळशीदास पळ

तुळशीदास पळ : वाळपईत लाइनमन दिवस उत्साहात; कर्मचाऱ्यांचा सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रकाश आणण्यासाठी वीज कार्यालयाच्या लाइनमनचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून प्रत्येक ग्राहकांना समाधानकारक सेवा आपल्यापरीने देताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाऊस असो वा ऊन कसलीही पर्वा न करता वीज कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावून दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, ग्राहकांना सेवा देताना आपल्या जिवाची काळजी घेत सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डिचोली वीज खात्याचे साहाय्यक अभियंता तुळशीदास पळ यांनी केले.

वाळपई नगरपालिका सभागृहात लाइनमन दिवसानिमित्त आयोजित खास कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाळपई वीज खात्याचे साहाय्यक अभियंता दीपक गावस, कनिष्ठ अभियंता रविश माजीक, अश्वीन नार्वेकर, शुभम गावस, विवेक गावस, साहाय्यक अभियंता ओलिंडा कुतिन्हो, ज्येष्ठ लाईनमन शाणू परवार उपस्थित होते.

तुळशीदास पळ पुढे म्हणाले, की आत्तापर्यंत वीज कार्यालयात संघर्षमय स्थितीत काम करणाऱ्या लाइनमनची कोणीही दखल घेतली नव्हती‌. मात्र, गेल्या वर्षीपासून वीज खात्याच्या माध्यमातून लाइनमनदिन साजरा करून त्यांची सेवा सन्मानित करण्याचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

लाइनमनच्या कार्याची योग्य दखल

वाळपईचे साहाय्यक अभियंता दीपक गावस म्हणाले, सत्तरी तालुक्यातील जंगलात जाऊन काम करणे खरोखरच अवघड आहे. मात्र, वीज खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या चांगल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. लाइनमनच्या कार्याची दखल घेण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT